spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाण्यासाठी मोदी एक्सप्रेस

श्रवण महिना हा सुरु झाला आहे आणि सर्व सण उत्सव हे जवळ येत आहेत. यातील सर्वानाच आवडला सण म्हणजे गणेशोत्सव आहे. अवघ्या काही दिवसांवर बाप्पाचे आगमन हे येऊन ठेपले आहे.

मुंबई :-  श्रवण महिना हा सुरु झाला आहे आणि सर्व सण उत्सव हे जवळ येत आहेत. यातील सर्वानाच आवडला सण म्हणजे गणेशोत्सव आहे. अवघ्या काही दिवसांवर बाप्पाचे आगमन हे येऊन ठेपले आहे. गणेशोत्सव जवळ आल्याने चाकरमान्यांना गावाकडे जाण्याचे वेध हे लागले आहेत. गणेशोत्सव या कालावधीत कोकणात जाणाऱ्यांची संख्या हि मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ट्रेन चे तिकीट मिळणे हे अनेकांसाठी अवघड होऊन जाते. तिकीटासाठी भाजपाच्या मंडळ किंवा तालुका अध्यक्षांना फोन करायचा आहे असं नितेश राणेंनी सांगितलं आहे. कणकवली, देवगड आणि वैभववाडी येथील मंडळ आणि तालुका अध्यक्षांना फोन करा असं आवाहन नितेश राणे यांनी केलं आहे.

दरम्यान, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यावर्षीही मोदी एक्स्प्रेस हि धावणार आहे. अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी एका ट्विट मार्फत दिली आहे.  आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत हि माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  “यंदाही गणपतीला गावी जाण्यासाठी मोदी एक्स्प्रेस आणण्यात येणार आहे. गेल्या १० वर्षापासून बसेस सोडत असून, मागील वर्षापासून मोदी एक्स्प्रेस सगळ्यांसाठी सोडण्यात आली. यावेळी २९ ऑगस्टला सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकावरून प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरुन तुमची हक्काची मोदी एक्स्प्रेस सुटणार आहे”. “ही एक्स्प्रेस दादरपासून कणकवलीपर्यंत जाणार असून, वैभववाडीमध्ये थांबणार आहे. मोदी एक्स्प्रेसमध्ये एक वेळेचं जेवण दिलं जाणार आहे. आरतीचं पुस्तकही देणार आहोत. सगळी तयारी झालेली आहे,” अशी माहिती नितेश राणे यांनी दिली आहे.

हे ही वाचा :-

कारशेड विरोधात ‘आरे’ मध्ये महामोर्चा 

Latest Posts

Don't Miss