spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बॉक्सिंगमध्ये दोन सुवर्ण पदकांची कमाई

Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतानं आतापर्यंत ४३ पदक जिंकली आहेत. ज्यात १५ सुवर्णपदक, ११ रौप्यपदक आणि १७ कांस्यपदकांचा समावेश आहे.

मुंबई :- Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतानं आतापर्यंत ४३ पदक जिंकली आहेत. ज्यात १५ सुवर्णपदक, ११ रौप्यपदक आणि १७ कांस्यपदकांचा समावेश आहे. भारताची महिला बॉक्सिर (Nitu Ganghas Won Gold Medal) नीतू घणघसने महिलांच्या ४५ -४८ किलो वजनी गटात सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. तिने अंतिम सामन्यात रेस्जटान डेमी जेडचा (England’s Demie-Jade Resztan) ५-० असा पराभव केला आहे. आजचा दिवस नीतूसाठी खास ठरला आहे. तिने कॉमनवेल्थ स्पर्धेत महिलांच्या किमान वजन (४५-४८ किलो) गटात यजमान इंग्लंडच्या रेस्जटान डेमी जेडचा ५-० असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. २१ वर्षीय नितूच्या शानदार हल्ल्याला डेमी-जेडकडे कोणतेही उत्तर नसल्यामुळे तिला सहज विजय मिळाला. तिने यावर्षी भारताला बॉक्सिंगमध्ये पहिले पदक मिळवून दिले. नितूच्या विजयामुळे भारताला एकूण ४१ वे पदक मिळाले.

आज संध्याकाळी सात वाजता आणि रात्री एक वाजता आणखी दोन भारतीय बॉक्सरचा अंतिम सामना होणार आहे. ज्यात भारताला आणखी दोन सुवर्णपदक मिळण्याची अपेक्षा आहे. भारताची स्टार बॉक्सर निकहत झरीनं भारताला सुवर्णपदक जिंकून देण्याच्या उद्देशानं रिंगणात उतरेल. तर, हेवीवेटच्या फायनल सामन्यात सागर अहलावत नशीब आजमवणार आहे. भारतीय वेळेनुसार, निकहतचा सामना सध्याकाळी सात वाजता सुरू होईल. तर, रात्री एक वाजता सागर अहलावतचा सामना पाहायला मिळेल.

नितूनंतर पुरुषांच्या बॉक्सिंगमध्ये अमित पंघालने सुवर्णपदक जिंकले. अमितने पुरुषांच्या फ्लायवेट गटातील अंतिम फेरीत इंग्लंडच्या कियारन मॅकडोनाल्डचा पराभव केला. राष्ट्रकुल स्पर्धेतील हे त्याचे पहिले-वहिले सुवर्णपदक ठरले. घणघस आणि अमित पंघालच्या पदकांमुळे भारताची एकूण पदक संख्या ४३ झाली असून त्यात १५ सुवर्ण, ११ रौप्य आणि १७ कांस्य पदकांचा समावेश आहे.

मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (पॉवरलिफ्टिंग), बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नवीन, भाविना (पीपी) ), नीतू घणघस, अमित पंघाल या सर्व स्पर्धकांनी आतापर्यंत सुवर्ण पदक पटकावले आहे.

हे ही वाचा :-

महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Latest Posts

Don't Miss