spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भाजपच्या बड्या नेत्याने केलं मोठ वक्तव्य, आणखी भूकंप होणार…

अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीवरून नाना पटोले यांनी सुद्धा सडकून टीका केली आहे. बुलढाणा येथे झालेल्या अपघातामधील मयतांवर सामुहिक अंत्यसंस्कार सुरु असताना दुसरीकडे राजभवनात शपथविधी सुरु होता.

काल (२ जुलै) राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप पाहायला मिळाला. राष्ट्रवादीचे अनेक आमदार आणि नेते शिंदे-फडणवीस सरकार मध्ये सामिल झाले असून काल अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तसेच अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी सुद्धा काल मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळेच आता महाराष्ट्राच्या राजकारणात विविध पडसाद उमटायला सुरवात झाली आहे. अशातच भाजपच्या अनेक नेत्यांनी येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी छोटे मोठे भूकंप होणार असल्याचा दावा केला आहे.

कालच्या सर्व राजकीय घडामोडी नंतर भाजपचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मोठा दावा केला आहे. अजून छोटे-मोठे भूकंप होत राहतील कोण-कोण एकट पडेल ते पाहत राहा, असे वक्तव्य महाजन यांनी केले आहे. राज्यातील घडामोडींवर प्रतिक्रिया देतांना गिरीश महाजन म्हणाले की, अजित पवार यांचे स्वागत आहे. देशाचे नेतृत्व फक्त मोदी करू शकतात हे त्यांना मान्य आहे. अजून छोटे मोठे भूकंप होत राहतील कोण-कोण एकट पडेल ते पाहत राहा. अजून बरेच लोक येणार आहेत, उद्धव ठाकरेच काय अजून कोण कोण एकट पडतं ते पहाच असा इशारा महाजन यांनी दिला आहे. रखडलेला मंत्रिमंडळ विस्तारही येणाऱ्या काही दिवसांत लवकरच होईल, असेही महाजन म्हणाले आहेत.

अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीवरून नाना पटोले यांनी सुद्धा सडकून टीका केली आहे. बुलढाणा येथे झालेल्या अपघातामधील मयतांवर सामुहिक अंत्यसंस्कार सुरु असताना दुसरीकडे राजभवनात शपथविधी सुरु होता. भाजपने केलेल्या पापाची फळे त्यांना भोगावीच लागणार आहे. महाराष्ट्राची जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही. रविवारचं दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातील काळा दिवस ठरला असेही पटोले म्हणाले. तर विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय आम्ही महाविकास आघाडीचे नेते बसून करू असेही पटोले म्हणाले.

हे ही वाचा:

राष्ट्रवादीने केली कारवाई, अजित पवारांसह ९ जणांवर अपात्रतेची याचिका

अजित पवारांच्या बंडखोरीनंतर रोहित पवार म्हणाले, राजकारणात का आलो…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss