spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Guru Purnima 2023, गुरू पौर्णिमेला तुमच्या गुरूंना पाठवा ‘या’ खास शुभेच्छा

गरुपौर्णिमा ही एक परंपरा आहे जी सर्व आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरूंना समर्पित आहे. गुरुपौर्णिमेचा सण भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मीयांद्वारे साजरा केला जातो.

गरुपौर्णिमा ही एक परंपरा आहे जी सर्व आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरूंना समर्पित आहे. गुरुपौर्णिमेचा सण भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मीयांद्वारे साजरा केला जातो.उन्हाळा संपल्यानंतर येणार्‍या आषाढ महिन्यातील पहिल्या पौर्णिमेला (जुलै-ऑगस्ट दरम्यान) गुरु पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्वाचा सण (festival)मानला जातो. त्यामुळेच या दिवशी आपल्या गुरुजनांना शुभेच्छा दिल्या जातात. भारतात अनेक शाळा,कॉलेज यांद्वारे हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिक्षकांना शुभेछया देण्यासाठी, हा दिवस शिक्षकवर्गासाठी महत्वाचा मानला जातो.

गुरुपौर्णिमेच्याच दिवशी व्यास ऋषीमुनी यांचा जन्म झाला असे मानले जाते. त्यामुळेच या दिवसाला व्यासपौर्णिमा असेही म्हटले जाते. महर्षी व्यास यांनी हिंदु संस्कुतीला (Hindu culture)अनेक धर्मग्रंथ (scriptures)दिले. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. धर्मशास्त्र(theology), नीतिशास्त्र (Ethics), व्यवहारशास्त्र (Behavioral science), मानसशास्त्र (Psychology)आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ व्यासांनी लिहिला. भारतात गुरुपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो. चला तर आज या गुरुपौर्णिमेच्या शुभेछया देऊयात आणि हा दिवस आणखीन खास बनवूयात .

– “ज्यांनी मला घडवलं या
जगात लढायला जगायला शिकवलं
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे
गुरू पौणिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा”

– “गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म सर्वकाही गुरूंचीच देन
माझ्या सर्व गुरूंना खूप खूप धन्यवाद!
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!”

– गुरू म्हणजे आहे काशी
साती तिर्थ तया पाशीॉ
तुका म्हणा ऐसे गुरू
चरण त्याचे हृदयी धरू
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

– “ना वयाचे बंधन, ना नात्याचे जोड
ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई नि:स्वार्थ दान,
गुरु त्यासी मानावा, देव तेथेची जाणावा,
गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा!”

– आई वडील प्रथम गुरू
त्यांच्यापासून सगळ्यांचे अस्तित्व सुरू
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

 

हे ही वाचा:

कंगनाच्या ‘Chandramukhi-2’ चित्रपटाची रिलिज डेट जाहीर, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Priya Bapat Umesh Kamat Love Story, फक्त १८ वर्षांची असताना ‘चॉकलेट बॉय’च्या प्रेमात पडली प्रिया

पाकिस्तानी कलाकारांना आमचा विरोध कायम आहे, त्यांच्या…अमेय खोपकरांच्या ट्वीटने वेधले लक्ष

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss