spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘OMG 2’ चित्रपटाचे poster रिलीज, लवकरच Teaser होणार रिलीज

अक्षय कुमारचा 'OMG 2' हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी हा प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर अक्षय कुमार सोबत अभिनेत्री यामी गौतम, अभिनेता पंकज त्रिपाठी देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

अभिनेता अक्षय कुमार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो त्यातच आता तो त्याच्या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वीच त्याने सोशल मीडियावर एक पोस्टर शेयर करत त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याचा मोस्ट अवेडेट चित्रपट ‘OMG 2’ हा लवकरच रिलिज (release)होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटासाठी उत्सुक आहेत. हा चित्रपट ‘OMG’ चित्रपटाचा सिक्वेल असणार आहे.

अक्षय कुमारचा ‘OMG 2’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी हा प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर अक्षय कुमार सोबत अभिनेत्री यामी गौतम, अभिनेता पंकज त्रिपाठी देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.अक्षय कुमारने शेयर केलेल्या पोस्टरमध्ये तो भगवान शंकराच्या भूमिकेत दिसत असून त्याने लांब जटा, अंगभर भस्म आणि हातात डमरू घेतलेला आहे. या पोस्टसोबतच त्याने या चित्रपटाचा टिझर (Teaser )लवकरच रिलिज (release)होणार असल्याचेही सांगितले आहे. त्यातच आता त्याचे हे पोस्टर सोशल मिडियावर (social media) खूप व्हायरल होत आहे. चाहते त्याच्या या लूकची फार प्रशंसा करत आहे.

या चित्रपटाचा पोस्टर शेयर करताना अक्षयने ,बस कुछ दिनों में…’असं कॅप्शन (Caption) दिलं आहे. तसेच त्याने पंकज त्रिपाठी यांच्या OMG-2 या चित्रपटामधील लूकचा फोटो देखील सोशल मीडियावर(social media) शेअर केला आहे. ‘मिलते हैं सच्चाई की राह पर’ असं कॅप्शन (Caption)अक्षयनं पंकज त्रिपाठी यांच्या फोटोला दिलेलं आहे. पंकज त्रिपाठी हे ‘OMG 2’ या चित्रपटात कांती शरण मुद्गल ही भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित राय यांनी केले असून राजेश बहल आणि अश्विन वर्दे यांच्या नेतृत्वाखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हे ही वाचा:

कंगनाच्या ‘Chandramukhi-2’ चित्रपटाची रिलिज डेट जाहीर, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Priya Bapat Umesh Kamat Love Story, फक्त १८ वर्षांची असताना ‘चॉकलेट बॉय’च्या प्रेमात पडली प्रिया

पाकिस्तानी कलाकारांना आमचा विरोध कायम आहे, त्यांच्या…अमेय खोपकरांच्या ट्वीटने वेधले लक्ष

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss