spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘लाल सिंह चड्डा’ चित्रपटातील व्यक्तिरेखा पंजाबी का ? – आमिरने केला खुलासा

येत्या ११ ऑगस्ट रोजी बॉलीवूडचा अभिनेता आमिर खानचा बहुप्रतीक्षित आणि मोठ्या प्रमाणात चर्चेत असणारा "लाल सिंह चड्डा" हा चित्रपट लवकरच आता पेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

मुंबई :-  येत्या ११ ऑगस्ट रोजी बॉलीवूडचा अभिनेता आमिर खानचा बहुप्रतीक्षित आणि मोठ्या प्रमाणात चर्चेत असणारा “लाल सिंह चड्डा” हा चित्रपट लवकरच आता पेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. अमीर खान आणि करीना कपूर खान हे दोघे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

अद्वैत चंदन यांचे दिग्दर्शन असेलल्या या चित्रपटाची पटकथा एरिक रोथ आणि अतुल कुलकर्णी यांनी लिहिली आहे. या संपूर्ण चित्रपटाचे शूटिंग तब्ब्ल १०० ठिकाणी करण्यात आलं आहे. या चित्रपटात आमिर एक पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटावरुन ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचे कथानक तयार करण्यात आले आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता आमिर खानने नुकतीच एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे तर हि मुलाखत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घेतली आहे. यावेळी आमिर खानने ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचे नाव, त्यातील भूमिका, चित्रपट निवडण्यामागचे कारण यांसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये सकारात्मकता येईल. प्रत्येक माणसाच्या चांगल्या वाईट बाजू असतात. काही माणसं संवेदनशील असतात. तर काही रागीट. पण हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रत्येक माणूस सकारात्मक होतो, असे मत आमिर खानने मांडले आहे. तसेच या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखेची भूमिका हि पंजाबी का आहे या बाबत देखील आमिरने एक खुलासा केला आहे. “चित्रपटाची पटकथा अतुल कुलकर्णी यांनी लिहिली आहे आणि जेव्हा त्यांनी पटकथा लिहिली तेव्हा मुख्य व्यक्तिरेखा ही सरदारजी म्हणूनच लिहिली होती. जेव्हा आम्ही पटकथा वाचली तेव्हा आम्हाला त्यात काही गैर वाटलं नाही. आम्हालाही ती संकल्पना आवडली. त्यामुळे आम्ही ती तशीच ठेवली आणि त्यावर काम सुरू केलं. त्यामुळे ही व्यक्तिरेखा पंजाबी आहे.”

तसेच या मुलाखती दरम्यान अमीर खानने देखील नागराज मंजुळेंना तुम्ही लाल सिंग चड्ढा चित्रपट कधी पाहणार? असा प्रश्न विचारला. त्यावर नागराज मंजुळे म्हणाले “मी हा चित्रपट पहिल्या दिवशी चित्रपट पाहणार आहे.” त्यावर आमिर खान म्हणाला, “नाही नाही. त्याआधी मी जेव्हा स्क्रिनिंग ठेवेन तेव्हा तुम्ही या. त्यावेळी तुम्ही हा चित्रपट पाहा”, असे म्हटल्यानंतर नागराज मंजुळेंनीही होकार दिला. “पण तुम्ही चित्रपट पाहणार हे ऐकूनच मी तणावाखाली आलो आहे. माझे हृदय आतापासून धडधडत आहे”, असेही आमिर खानने म्हटले.

 

हे ही वाचा :-

नांदेड, हिंगोली दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विसर ?

Latest Posts

Don't Miss