spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Thackeray Group Meeting, राजकीय घडामोडींनंतर ठाकरे गटाची आज महत्वाची बैठक

आज दिनांक ४ जुलै रोजी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे. सर्व आमदार, खासदार, नेते, उपनेते यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गेल्या २- ३ दिवसांपासून राज्याच्या राज्याच्या राजकारणात अनेक मोठं मोठ्या घडामोडी या होत आहेत. एक वर्षांपूर्वी देखील असाच गोंधळ हा राज्यात दिसून येत होता. आता पुन्हा सर्व तेच चित्र दिसून येत आहे. एक वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत बाहेर निघाले. त्यांनतर आता एक वर्षाने अजित पवार हे राष्ट्रवादीमधून बंड करून बाहेर निघाले आहेत. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शप्पथ घेतली. या सर्व घडामोडी नंतर आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एक महत्वाची बैठक बोलावली आहे.

आज दिनांक ४ जुलै रोजी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे. सर्व आमदार, खासदार, नेते, उपनेते यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी १२.३० वाजता शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) इथे ही बैठक पार पडणार आहे. बैठकीत उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी बातचीत करुन महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) राहायचं की एकला चलो रेची भूमिका घ्यायची याबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेत ठाकरे गट आपली भूमिका जाहीर करेल, असं समजतं.

तसेच काल दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची साथ देऊया, असा सूर मनसेच्या बैठकीत उमटला. राज ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. लोकसभा निवडणूक ताकदीने लढायची आहे, कशी लढायची यावर त्यांनी नेत्याचं मत जाणून घेतलं. यावेळी उपस्थित नेत्यांपैकी काहींनी लोकसभेत उद्धव ठाकरेंसोबत जायला पाहिजे असं मत व्यक्त केलं. यावर राज ठाकरेंनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच काल सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेना भवनाबाहेर पोस्टर बाजी देखील केली होती. शिवसेना भावनाबाहेर लावण्यात आलेल्या या बॅनर वर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या राजकरणाचा चिखल झाला….राज ठाकरे – उद्धव ठाकरे आता तरी एकत्र या…संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे असा आशय या बॅनर वर लिहिण्यात आला आहे. सध्या शिवनसेना भवन परिसरात लावण्यात आलेल्या या बॅनरची तुफान चर्चा चालू आहे.

हे ही वाचा:

Prajakta Mali ने सह कलाकारासाठी शेअर केली खास पोस्ट, म्हणाली…

Delhi Cab Driver, एकाच टँक्सीमध्ये WiFi पासून Snacks सह सर्व सुविधा उपलब्ध

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss