spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उद्योगपती अनिल अंबानीवर देखील ED ची नजर

भारतातल्या उद्योगपतीपैकी अंबानी ग्रॉऊंपचे एक म्हणजे अनिल अंबानी आहेत. सध्या अनिल अंबानी संदर्भात एक बातमी समोर आली आहे.

भारतातल्या उद्योगपतीपैकी अंबानी ग्रॉऊंपचे एक म्हणजे अनिल अंबानी आहेत. सध्या अनिल अंबानी संदर्भात एक बातमी समोर आली आहे. अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या पत्नी टीना अंबानी (Tina Ambani) ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत. परदेशी चलन व्यवस्थापन कायद्याची (FEMA) पायमल्ली केल्याप्रकरणी काल अनिल अंबानी यांची तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली होती आणि आज त्यांच्या पत्नी ईडीसमोर हजर झाल्या आहेत. त्यामुळे आता ED चा धाक हा अनिल अंबानी यांच्या पर्यंत येऊन पोहोचला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,अनिल अंबानींच्या कंपन्यांमधील गुंतवणुकीशी संबंधित हे प्रकरण आहे. ६४वर्षीय अनिल अंबानी यापूर्वी २०२० मध्ये येस बँकेचे प्रवर्तक राणा कपूर आणि इतरांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाले होते. उद्योगपती अनिल अंबानी यांची परकीय चलन विनियम कायद्याच्या उल्लंघन प्रकरणात सोमवारी ईडीच्या मुंबई कार्यालयात चौकशी देखील करण्यात आली. अनिल अंबानी हे सकाळी दहाच्या सुमारास ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर तब्बल सात आठ तासांनंतर अनिल अंबानी हे ईडी कार्यालयातून बाहेर पडले होते. आणि आज टीना अंबानी यांची देखील चौकशी करण्यात येणार आहे त्यामुळे आता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की तीन अंबानी यांची चौकशीनेमकी किती तास होणार होणार आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये स्विस बँकेतील खात्यात ८१४ कोटींच्या ठेवी दडवून ठेवत ४२० कोटींची कर चुकवेगिरी केल्याच्या आरोपाखाली आयकर विभागानं अनिल अंबानींना ८ ऑगस्ट २०२२ रोजी नोटीस पाठवली होती. मात्र कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी दहा वर्षांपूर्वी झालेल्या व्यवहारांबाबत ही नोटीस कशी पाठवता येईल, असा दावा करत अंबानींनी त्याला हायकोर्टात आव्हान दिलं आहे. या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती एस.जी. डिगे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या नोटीशीत आयकर विभागानं आरोप केला होता की, परदेशातील बँकेत लपवून ठेवलेल्या या संपत्तीची माहिती जाणूनबूजन भारतीय प्राप्तीकर खात्याला दिली नाही. त्यामुळे ब्लॅक मनी संदर्भातील कायद्याच्या कलम ५० आणि ५१ अनिल अंबानींनीवर कारवाई का करण्यात येऊ नये?, ज्यात दोषी आढळल्यास १० वर्षांची कैदही होऊ शकते. अशी विचारणा करण्यात आली आहे. याच नोटीशीविरोधात अनिल अंबानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला होता.

हे ही वाचा:

भारतीय महिला क्रिकेट टीमचे हेड कोच बदलणार?

संजय राऊतांच्या हल्लाबोल, भाजप राजकारणातील सिरीयल किलर आणि…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss