spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

UDDHAV THACKERAY – RAJ THACKERAY यांच्यासाठी पुन्हा एकदा झळकले बॅनर, हीच ती योग्य वेळ…

राज्यच सध्या जे काही चालू आहे त्यावर महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्रित यावे अश्या अनेक चर्चाना उधाण आलं आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या उलथापालथी या होत आहेत. दिनांक २ जुलै २०२३ रोजी राज्याच्या राजकारणात अनेक मोठं मोठ्या घडामोडी घडल्या आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडांनंतर राज्यात पुन्हा एक वर्षांनंतर राज्यात मोठा बंड हा झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केला आहे. अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) भूकंप घडवला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्यासोबत असलेल्या ८ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या सर्व राजकीय नाट्यानंतर आता एकीकडे सामान्य नागरिकांकडून अनेक प्रतिक्रिया तर येतच आहेत तर दुसरीकडे पुन्हा एकदा राज ठाकरे (Raj Thackarey) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) यांच्या एकजूटीच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे.

राज्यच सध्या जे काही चालू आहे त्यावर महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्रित यावे अश्या अनेक चर्चाना उधाण आलं आहे. या राजकारणावर मात करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी एकत्र यावे अशी मागणी सध्या मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून होत असल्याचं चित्र सध्या पहायला मिळत आहे. वारंवार पुन्हा एकदा ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी साद हि घातली जात आहे. तसेच अश्या प्रकारचे बॅनर झळकले जात आहेत. अजित पवार यांच्या शपथविधी नंतर दुसऱ्या दिवशी अश्या आशयाचा बॅनर हा शिवसेना भावनाबाहेर झळकले होते तर आता कल्याण परिसरात पुन्हा एकदा बॅनर झळकताना पहायला मिळत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी कल्याण मध्ये देखील मनसे कार्यकर्त्यांकडून आवाहन करत केडीएमसी मुख्यालयासमोर बॅनर लावण्यात आले आहेत.

‘महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र या….हीच ती योग्य वेळ, महाराष्ट्राला राजकारण नको ,तर महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्ही एकत्र या, महाराष्ट्रातील तमाम जनतेची इच्छा’ असा मजकूर या बॅनरवर आहे. तसेच या बॅनर वर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे ,उद्धव ठाकरे यांचे फोटोही लावण्यात आले आहेत. मनसेच्या माजी नगरसेविका मीनाक्षी डोईफोडे यांनी हे बॅनर लावले आहेत. अजित पवारांनी सत्तेमध्ये सहभाग घेतल्यानंतर राज्यात एकच खळबळ माजली आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

तर शिवसेना भावनाबाहेर लावण्यात आलेल्या या बॅनर वर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या राजकरणाचा चिखल झाला….राज ठाकरे – उद्धव ठाकरे आता तरी एकत्र या…संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे असा आशय या बॅनर वर लिहिण्यात आला आहे. सध्या शिवनसेना भवन परिसरात लावण्यात आलेल्या या बॅनरची तुफान चर्चा चालू आहे. त्यामुळे आता पुढे राजकीय वर्तुळात आणखी नवीन काय घडामोडी घडतील हे पाहणं नक्कीच महत्वाचं ठरेल.

हे ही वाचा:

Prajakta Mali ने सह कलाकारासाठी शेअर केली खास पोस्ट, म्हणाली…

Delhi Cab Driver, एकाच टँक्सीमध्ये WiFi पासून Snacks सह सर्व सुविधा उपलब्ध

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss