spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे “ही” अवस्था – रुपाली चाकणकरांचे स्पष्टीकरण

भंडाऱ्यातील सामुहिक बलात्कार प्रकरणात (Bhandara Gang Rape Case) एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

मुंबई :- भंडाऱ्यातील सामुहिक बलात्कार प्रकरणात (Bhandara Gang Rape Case) एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. भंडारा जिल्ह्यातील तरुणीवर पुन्हा दुसऱ्यांदा बलात्कार झाला आहे आणि हा बलात्कार पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे असा आरोप केला जात आहे. त्यामुळे या केस प्रकरणी ३ पोलिसांचे निलंबन करण्यात आले, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी दिली आहे.

पीडितेवर दुसऱ्यांदा झालेला बलात्कार हा पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप केला जात आहे. पोलिसांनी दाखवलेल्या असंवेदनशीलतेमुळेच महिलेवर पुन्हा अत्याचार झाल्याचं प्राथमिक तपासात उघडकीस आलं आहे. पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गोरेगावातील मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. तर लाखनी पोलिसांनी केलेल्या हलगर्जीपणा संदर्भात भांडाऱ्याचे पोलीस अधिक्षक लोहित मसानी यांना विचारणा केली आहे. पीडिता ही पोलीस ठाण्यात आली होती, त्यावेळी तिचे कपडे देखील व्यवस्थित होते. मात्र तिला विचारपूस केल्यावर ती काहीही सांगत नव्हती, त्यामुळे तिला पोलीस ठाण्यात आसलेल्या महिला सुरक्षा कक्षात महिला पोलिस शिपयांसोबत बसवून ठेवलं. मात्र पहाटेच्या सुमार पीडिया पोलीस ठाण्यातून पळून गेली, अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली.

पीडित महिलेवर गोरेगावच्या जंगलात बलात्कार झाला. दुसऱ्या दिवशी मुरमाळी गावाजवळ फिरणाऱ्या या महिलेची तिथल्या पोलीस पाटील महिलेनं विचारपूस केली. या पोलीस पाटील महिलेनं तिला लाखनी पोलीस ठाण्यात पाठवलं. तिथे तिला वैद्यकीय मदत देण्याऐवजी आधी तिची चौकशी केली. त्यानंतर ती महिला पोलीस ठाण्यातून बाहेर पडली आणि धर्मा ढाब्यावर गेली. तिथे दोघांनी तिच्यावर पुन्हा बलात्कार केल्याची घटना घडली. पीडिता ३१ जुलैला लाखनी पोलीस ठाण्यात आली असतानाच पोलिसांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि जर ती पोलीस ठाण्यात पोहोचली होती, तर तिच्यावर तिथून पळून जाण्याची वेळ का आली? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहेत.

हे ही वाचा :-

“राज्याला भरगोस निधी मिळणार”, निति आयोच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदेंचं विधान

Latest Posts

Don't Miss