spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Chandrayan Launch, ‘या’ दिवशी अवकाशात झेप घेणार Chandrayan 3

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चांद्रयान ३ च्या उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. ही चंद्रयान ३ ची मोहिम लवकरच लॉन्च (Launch) करण्यात येणार असल्याचे इस्त्रोचे (ISRO) प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितले आहे .

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चांद्रयान ३ च्या उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. ही चंद्रयान ३ ची मोहिम लवकरच लॉन्च (Launch) करण्यात येणार असल्याचे इस्त्रोचे (ISRO) प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितले आहे .सतिश धवन स्पेस सेंटर (Space Center) मधून हे चंद्रयान ३ चंद्राकडे झेप घेणार आहे. अखेर चंद्रयान लॉन्च (Launch) करण्याची तारीख ठरली आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) बुधवारी रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात चांद्रयान -३ ला लॉन्च व्हेईकल (Launch Vehicle) मार्क सह यशस्वीरित्या एकत्रित केले. त्यातच आता हे यानं १४ जुलै २०२३ ला चांद्रयान – ३ दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी चंद्राकडे झेपावले जाणार आहे. चंद्रावर सुरक्षित लँडिंग करणे हे चांद्रयान – ३ चे लक्ष्य असणार आहे. हे यानं यशस्वी पार पडले तर अंतराळ क्षेत्रात भारताचे हे एक मोठे यश असेल. असे इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितले. या यानाच्या यशस्वितेसाठी नवीन उपकरणे तयार करण्यात आली आहेत. अल्गोरिदम (algorithm) सुधारले आहेत.

इस्रोच्या अधिकाऱ्यांच्या मते चांद्रयान – ३ हे यानं चांद्रयान – २ चा पुढचा टप्पा असेल.हे यानं चंद्राच्या पृष्ठभागावर उतरुन चाचण्या घेईल आणि दिसायला अगदी चांद्रयान -२ प्रमाणे असेल. यामध्ये ऑर्बिटर (Orbiter), लँडर (Lander) आणि रोव्हर (rover) असणार आहे .चांद्रयान – २ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यास अयशस्वी ठरल्या कारणाने चांद्रयान -३ चे लक्ष्य चंद्रावर सुरक्षितरित्या लँड करणे असणार आहे. चांद्रयान -२ च्या अपघातानंतर चांद्रयान -३ चे प्रक्षेपण चार वर्षांनंतर होणार आहे. या यानाद्वारे पृथ्वीपासून दूर असणाऱ्या चंद्रावर सॉफ्ट लँडिंग (Soft landing) करण्याचा उद्देश चांद्रयान -३ मध्ये करण्यात येणार आहे. याआधी अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांनी यापूर्वी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग (Soft landing) केलं आहे.

हे ही वाचा:

ओबीसीच्या मुद्यावरून फडणवीस आणि पवारांमध्ये हेवेदावे

Limca Book of Records मध्ये झाली सर्वात जास्त काळ चालणारी मालिका म्हणून ‘या’ मराठी मालिकेची नोंद…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss