spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Kartik Aryan च्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटात झळकणार ही अभिनेत्री, नाव ऐकून तुम्हाला ही बसेल धक्का

'चंदू चॅम्पियन' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा कबीर खान (Kabir Khan) यांनी सांभाळली आहे. हा बहुचर्चित सिनेमा १४ जून २०२४ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा मनोरंजनसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेता आहे. कार्तिकचा ‘सत्यप्रेम की कथा’ (Satyaprem Ki Katha) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात प्रचंड धुमाकूळ घालत आहे. दरम्यान त्याच्या आगामी ‘चंदू चॅम्पियन’ (Chandu Champion) या सिनेमाची नुकतीच घोषणा झाली असून या सिनेमात कार्तिक सोबत अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री झळकणार आहे.

काही दिवसांपूर्वीच ‘चंदू चॅम्पियन’ या सिनेमाची निर्मात्यांकडून घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन झळकणार आहे. नुकतीच या सिनेमा बद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. ‘चंदू चॅम्पियन’ या सिनेमात कार्तिक सोबत बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. ‘चंदू चॅम्पियन’ हा क्रीडाविषयक सिनेमा आहे. या सिनेमात प्रेक्षकांना उत्तम स्पोर्ट्स ड्रामा पाहायला मिळणार आहे.तसेच या सिनेमात प्रेक्षकांना उत्कृष्ट वीएफएक्स सुद्धा पाहायला मिळणार आहेत. ‘चंदू चॅम्पियन’ या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) यांनी केली आहे.

‘चंदू चॅम्पियन’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा कबीर खान (Kabir Khan) यांनी सांभाळली आहे. हा बहुचर्चित सिनेमा १४ जून २०२४ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, साजिद नाडियाडवाला आणि कबीर खान यांनी ‘चंदू चॅम्पियन’ या सिनेमासाठी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरला विचारणा केली आहे. त्यामुळे आता कार्तिक आणि श्रद्धाला पहिल्यांदा एकत्र रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

हे ही वाचा:

नेत्यांच्या कुंडलीत दडलंय काय? | Time Maharashtra | Maharashtra Politics

Salaar चा धमाकेदार टीझर आऊट, प्रभासचा लूक पाहून अंगावर शहारे…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss