spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वर्षा निवासस्थानी राज ठाकरे CM शिंदेंच्या भेटीला…

सध्या राजकारणात बरेच बदल होत असून या राजकीय घडामोडींना वेग येताना दिसून येत आहे.अनेक राजकारणांनी पक्षपातीपणा (Biased) करत आपले पक्ष बदलले तर काहींनी राजकारणात आपली एन्ट्री (Entry) घेतली.

सध्या राजकारणात बरेच बदल होत असून या राजकीय घडामोडींना वेग येताना दिसून येत आहे.अनेक राजकारणांनी पक्षपातीपणा (Biased) करत आपले पक्ष बदलले तर काहींनी राजकारणात आपली एन्ट्री (Entry) घेतली. काही दिवसांपासून मनसे- ठाकरे गट यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चा समोर येत असून ,आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत.या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे होते.

राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले असून ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी घेतली गेली हे अद्याप समोर आले नाही. राज्यातील काही प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ते आपल्या सहकाऱ्यांसह ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेल्याचे बोलले जात आहे. मात्र या भेटीचे आता अनेक वेगळे ,राजकीय अर्थ देखील काढले जात आहेत.एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील बंडानंतरही राज ठाकरेंनी वैचारिक भूमिका (ideological role) घेत शिंदेंनी केलेल्या बदलांचा आदराने स्वागत केला. राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंच्या आतापर्यंत अनेकदा भेटीगाठी झाल्या आहेत. आतापर्यंत त्यांच्यातील संबंध चांगले राहिले आहेत.

दरम्यान अजित पवारांच्या (Ajit Pawar) नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) शिंदे- फडणवीस सरकारमध्ये समावेश झाल्यानंतर राज्यातील राजकारण आता अधिकच अस्थिर (Unstable) झाले आहे. आता ठाकरे- शिंदेंच्या भेटीने पुन्हा एकदा अनेक चर्चांना उधाण आले असून यामागे काही नव्या राजकीय समिकरणांचा (political equations) समावेश असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.त्यातच आता महापालिकेच्या निवडणुका (Municipal elections) लवकरच होणार असून या निवडणुकांची तयारी जोमाने सुरु झाली आहे.या पार्श्वभूमीवर ठाकरे -शिंदेच्या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा (discussion) रंगू लागल्या आहेत.

हे ही वाचा:

शरद पवारांच निवडणूक आयोगाला पत्र, पक्षाच्या चिन्हावर दावा केल्याची माहिती का दिली नाही?

भाजपकडून शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न? शिंदे-फडणवीस यांची रंगली तब्ब्ल एक तास बैठक…

Chandrayan Launch, ‘या’ दिवशी अवकाशात झेप घेणार Chandrayan 3

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss