spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रात्री उपमुख्यमंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, सव्वा दोन तास चर्चा

काल दिनांक ७ जुलै रोजी मध्यरात्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात एक भेट झाली आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या उलथापालथी या होत आहेत. दिनांक २ जुलै २०२३ रोजी राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड ही घडली आणि त्यामुळे राज्यातील वातावरण हे पुन्हा एकदा अस्थिर झाले आहे. राज्यात पुन्हा एक वर्षांनंतर मोठा बंड हा झाला. राष्ट्रवादीचे नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केला आहे. अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) भूकंप घडवला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्यासोबत असलेल्या ८ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडीनंतर राज्यातील सध्या अस्थिर आहे. तर दुसरीकडे काल दिनांक ७ जुलै रोजी मध्यरात्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात एक भेट झाली आहे.

काल रात्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाली आहे. वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस हे सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते. त्यानंतर मध्यरात्री एक वाजून चोवीस मिनीटांनी फडणवीस तेथून बाहेर पडले. त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अद्याप समजले नाही. तर दुरीकडे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि त्यांचे शिवसेना नाराज असल्याच्या चर्चा देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारासोबत महामंडळाचे देखील लवकरात लवकर वाटप करत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिंदे आणि फडणवीस यांच्याकडून करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जरी सत्तेत सोबत असली तरी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. हीच बाब दोन्ही गटाच्या आमदारांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पटवून देणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे .

सध्या राज्यात सातत्यानं विविध राजकीय घडामोडी घडत आहे. वर्षभरापूर्वी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड करत गुवाहाटी गाठली होती. त्यांनतर त्यांनी भाजपबरोबर सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केले. त्यांनी देखील काही आमदारांसह सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अजित पवार हे पुन्हा पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले तर अन्य राष्ट्रवादीच्या 8 जणांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे.

हे ही वाचा:

UDDHAV THACKERAY – RAJ THACKERAY यांच्यासाठी पुन्हा एकदा झळकले बॅनर, हीच ती योग्य वेळ…

सामनातून शिंदेंवर हल्लाबोल, राज्यात सत्तेसाठी गुवाहाटीत ‘रेडा’ बळी दिला, पण…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss