spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अखेर आज मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त, परंतु शिंदे यांच्याकडून सस्पेन्स कायम

तब्ब्ल ३९ दिवसांनी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. अखेर या विस्तार आज मुहूर्त हा मिळाला आहे.

मुंबई :- तब्ब्ल ३९ दिवसांनी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. अखेर या विस्तार आज मुहूर्त हा मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखालील आज सकाळी ११ वाजता राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होणार आहे. राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपत देतील. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात हालचालीही वाढल्या आहेत. राजभवनातील दरबार हॉल हा राखीव ठेवण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. तसेच मंत्रिमंडळ विस्तार होताच पावसाळी अधिवेशन घेण्याच्याही हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या १७ ते २६ ऑगस्ट या कालावधीत पावसाळी अधिवेशन होणार आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे समर्थक आमदार त्यांच्या मतदारसंघांमधून मुंबईत दाखल झाले आहेत. तर भाजपचे संभाव्य मंत्रीही मुंबईत दाखल झाले आहेत. भाजप आणि शिंदे गटाचे मिळून एकूण १८ मंत्री आज शपथ घेणार आहेत. शिंदे गटाच्या नऊ तर भाजपच्या नऊ मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. विशेष म्हणजे भाजपचे आणखी २ जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पण हे दोन जण कोण हे अद्याप समोर आले नाही. या १८ ते २० आमदारांमध्ये भाजप कडून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), सुधीर मुनंगटीवार (Sudhir Mungantiwar), गिरीश महाजन (Girish Mahajan), सुरेश खाडे (Suresh Khade), अतुल सावे (Atul Save), मंगल प्रभात लोढा (MangalPrabhat Lodha), रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan), विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) या आमदारांची संभाव्य नावे समोर आली आहेत. तर शिंदे गटांकडून उदय सामंत (Uday Sawant), दादा भुसे (Dada Bhuse), संजय शिरसाट (Sanjay Sirsat), संदीपान भुमरे (sandipan Bhumare), गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), भरत गोगावले (Bharat Gogawale), शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हि संभाव्य नावे समोर आली आहेत. भाजप व शिंदे गट यांच्याकडून कोणतेही नाव अद्यापही अधिकृतपणे जाहीर करण्यात आले नाही सकाळपर्यंत नावे निश्चित होतील असे सांगत राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या गटातून कोणाला संधी मिळणारी याबाबत सस्पेन्स हा कायम ठेवला आहे.

महिनाभरापूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आमदारांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एक प्रकारचा मोठा भूकंप झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री होणं हा मोठा आश्चर्याचा धक्का मानला गेला.

हे ही वाचा :-

युती टिकवण्यासाठी अमित शहांचे प्रयत्न; थेट मुख्यमंत्र्यांना फोन

Latest Posts

Don't Miss