spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Trial Period Song Dhappa,जेनेलियाच ‘धप्पा’ गाणं चांगल्याच चर्चेत

हमीच सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या जेनेलियाच नुकताच नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अनेक वर्षांपासून चित्रपट सृष्टीकडे पाठ फिरवलेल्या जेनेलियाने मागे ‘वेड’ या चित्रपटातून तिचे पुनरागमन केले.

नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या जेनेलियाच नुकताच नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अनेक वर्षांपासून चित्रपट सृष्टीकडे पाठ फिरवलेल्या जेनेलियाने मागे ‘वेड’ या चित्रपटातून तिचे पुनरागमन केले. जेनेलिया आणि रितेश देशमुखच्या वेड या चित्रपटाने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावलं. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यातच आता जेनेलियाचा नवीन चित्रपटाचे गाणे रिलिज झाले असून ते फार चर्चेत आहे.

जेनेलियाचा येत्या काळात ट्रायल पिरियड ही वेब सिरिज ऑनलाईन प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजच्या (Web series)माध्यमातून ती ओटीटीवर (OTT) दिसणार आहे. त्याचा टीझर आणि ट्रेलर व्हायरल झाला होता. आता त्याचे पहिले गाणेही व्हायरल झाले आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.जेनेलिया ही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. तीचे आणि रितेशची अनेक रील्स सोशल मीडियावर (Social media) नेहमीच पॉप्युलर होत असतात. तिचे ट्रायल पिरियड (Trial period) वेब सेररीजमधील (Web series) धप्पा हे गाणे आज व्हायरल झाले असून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. ती क्लिप शेयर करताना तिने लिहिलं आहे की, फादर ऑन ट्रायल पिरियड (Father on trial period). काही तासांपूर्वी व्हायर झालेल्या त्या व्हिडियोला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.

दरम्यान आता ट्रायल पिरियड (Trial period)ही वेब सिरिज जिओसिनेमावर ((jiocinema)) प्रदर्शित होणार असून जेनेलिया यामध्ये सिंगल मदरची (single mother) भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट मैत्री आणि प्रेम यांचे चांगले बंध दाखवतो. तसेच हा चित्रपट आधुनिक कुटुंबांचे प्रेम आणि गुंतागुंत दर्शविण्याचा प्रयत्न करतो.या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे यांनी केली असून क्रोम पिक्चर्स प्रोडक्शन, हेमंत भंडारी, अमित रविंदरनाथ शर्मा द्वारे करण्यात आलेली आहे. हा चित्रपट २१ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

हे ही वाचा:

Kartik Aryan च्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटात झळकणार ही अभिनेत्री, नाव ऐकून तुम्हाला ही बसेल धक्का

रात्री उपमुख्यमंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, सव्वा दोन तास चर्चा

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss