spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

… इतर जण एकमेकांच्या उरावर बसायला मोकळे – विनायक राऊत यांचा टोला

आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा आज पार पडणार असून पहिल्या टप्प्यात १८-२० मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता हि वर्तवली जात आहे.

मुंबई :- आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा आज पार पडणार असून पहिल्या टप्प्यात १८-२० मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता हि वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी ३९ दिवसांपासून राज्याचं मंत्रालय सचिवालय झालं आहे, आज तरी ते मंत्रालय व्हावे अशी इच्छा आहे असा टोला एबीपी माझाशी बोलताना लगावला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी ३९ दिवसांपासून राज्याचं मंत्रालय सचिवालय झालं आहे, आज तरी ते मंत्रालय व्हावे अशी इच्छा आहे असा टोला एबीपी माझाशी बोलताना लगावला आहे.

“या सरकारला भविष्य नाही. सुप्रीम कोर्टात अपात्रतेसंदर्भात जे प्रकरण आहे, त्यामध्ये आम्हाला नक्कीच न्याय मिळेल. देशातील सर्व कायदेतज्ज्ञ हेच सांगत आहेत. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे,” असं विनायक राऊत यांनी सांगितलं आहे. “४० जणांना मंत्रीपदाचं आमिष दाखवून शिवसेनेपासून दूर घेऊन गेले आहेत. त्याच्यापैकी ८-१० जणांचा नंबर लागेल. इतर जण एकमेकांच्या उरावर बसायला मोकळे झाले आहेत. त्यामुळेच पाय खेचणं सुरु झालं आहे. काही जण आमच्या संपर्कात येण्यास सुरुवात झाली आहे,” “संपर्कात असले तरी आम्ही कोणावारही दबाव टाकलेला नाही. आमच्याकडे पुन्हा येण्यासाठी त्यांना कोणतंही आमिष दाखवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलेलं नाही. ज्यांना मनापासून जायचं आहे ते गेले असल्याने जास्त मनधरणी करायची नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. नितीन देशमुख, कैलास पाटील यांच्याप्रमाणे ज्यांना वाटत असेल, त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत,” असं विनायक राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

 

हे ही वाचा :- 

मला देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता – अजित पवार

Latest Posts

Don't Miss