spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य असेल – दादा भुसे

आज तब्ब्ल महिन्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारचा अखेर आज सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होणार आहे. शिंदे गटाचे समर्थक आमदार त्यांच्या मतदारसंघांमधून मुंबईत दाखल झाले आहेत.

मुंबई :- आज तब्ब्ल महिन्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारचा अखेर आज सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होणार आहे. शिंदे गटाचे समर्थक आमदार त्यांच्या मतदारसंघांमधून मुंबईत दाखल झाले आहेत. तर भाजपचे संभाव्य मंत्रीही मुंबईत दाखल झाले आहेत. शिंदे गटांकडून उदय सामंत (Uday Sawant), दादा भुसे (Dada Bhuse), संजय शिरसाट (Sanjay Sirsat), संदीपान भुमरे (sandipan Bhumare), गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), भरत गोगावले (Bharat Gogawale), शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हि संभाव्य नावे समोर आली आहेत. परंतु शिंदे गट यांच्याकडून कोणतेही नाव अद्यापही अधिकृतपणे जाहीर करण्यात आले नाही सकाळपर्यंत नावे निश्चित होतील असे सांगत राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या गटातून कोणाला संधी मिळणारी याबाबत सस्पेन्स हा कायम ठेवला आहे.

भाजप आणि शिंदे गटाचे मिळून एकूण १८ मंत्री आज शपथ घेणार आहेत. शिंदे गटाच्या नऊ तर भाजपच्या ९ मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. दरम्यान दादा भुसे यांनी प्रसिद्ध वाहिनीशी संवाद साधताने सांगितले, आज नक्की कोण कोण शपत घेणार आणि किती मंत्री असतील याबाबत सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांचे आहेत. सकाळी ९ वाजता शिवसेना पक्षाची बैठक आहे. परंतु हे सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचे आहेत. मुख्यमंत्री जे काही निर्णय करतील त्याचे अमंलबजावणी करणे आपले कर्तव्य आहे.

 

हे ही वाचा :-

… इतर जण एकमेकांच्या उरावर बसायला मोकळे – विनायक राऊत यांचा टोला

Latest Posts

Don't Miss