spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्राचे नवे कॅबिनेट मंत्रिमंडळ

महिनाभरापूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आमदारांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एक प्रकारचा मोठा भूकंप झाला होता.

मुंबई :- महिनाभरापूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आमदारांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एक प्रकारचा मोठा भूकंप झाला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री होणं हा मोठा आश्चर्याचा धक्का मानला गेला. आज तब्ब्ल महिन्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारचा अखेर आज सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) हा झाला आहे. तब्ब्ल ३९ दिवसांनी आज मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त हा मिळाला आहे. अवघ्या काही क्षणापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सस्पेन्स हा कायम होता.

आज राजभवणार शपथविधी हा पार पडला आहे. महाराष्ट्राला नवे १८ मंत्री मिळाले आहेत. परंतु आता भाजपच्या ९ आमदारांनी तर शिंदे गटांच्या ९ आमदारांनी शपत विधी घेतली आहे. यावेळी राजभवनात राज्यपाल भगतसिंह, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते अजित पवार देखील तेथे उपस्थित होते.

शिंदे गट आणि भाजप सरकार यांच्या एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपत हि घेतली आहे. त्यात सर्वच मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शिंदे गटाचे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), दादा भुसे (Dada Bhuse), संजय राठोड (Sanjay Rathod), संदीपान भुमरे (Sandipan Bhumre), उदय सामंत (Uday Samant), तानाजी सावंत (Tanaji Sawant), अब्दुल सत्तार (Abdul Sattar), दीपक केसरकर (Deepak Kesarkar), शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), तर भाजप पक्षातून राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit), गिरीश महाजन (Girish Mahajan), सुरेश खाडे (Suresh Khade), रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan), अतुल सावे (Atul Save), मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) या सर्व आमदारांनी शपथ घेतली आहे.

हे ही वाचा :-

Maharashtra Cabinet Expansion : आज एकूण 18 मंत्री कॅबिनेट मंत्रिपदाची शपत घेणार

Latest Posts

Don't Miss