spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड २’ च्या संवादावर व दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप

ओह माय गॉड' (OMG 2) चित्रपटाचा सीक्वेल असणार आहे. मात्र आता या चित्रपटातील काही संवाद आणि दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने (Censor Board) आक्षेप नोंदवला आहे.

सध्या अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड २’ (OMG 2) चित्रपटाची सर्वत्र फार चर्चा होत आहे. या चित्रपटाचा टीजर दोन दिवसांपूर्वच रिलिज करण्यात आला होता. याचा ट्रेलर अद्याप रिलिज झाला नसून हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ‘ओह माय गॉड’ (OMG 2) चित्रपटाचा सीक्वेल असणार आहे. मात्र आता या चित्रपटातील काही संवाद आणि दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने (Censor Board) आक्षेप नोंदवला आहे.

भगवान शिव यांचा रेल्वेच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात येतो,असे एक दृश्य या चित्रपटात दाखवले आहे. यावर आक्षेप घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सेन्सॉर बोर्डाने (Censor Board) अक्षयचा ‘ओएमजी २’ (OMG 2) हा चित्रपट रिव्ह्यू समितीकडे परत पाठवला आहे. चित्रपटातील काही दृश्ये आणि संवाद आक्षेपार्ह असल्याचे बोलले जात आहे. पण याबद्दल सेन्सॉर बोर्डाने (Censor Board) अद्याप काहीही माहिती दिलेली नाही.आदिपुरुष चित्रपटानंतर आता सेन्सॉर बोर्ड (Censor Board) या चित्रपटासाठी सावध होत असल्याचे दिसून येत आहे. चित्रपटाबद्दल कोणताही वाद नको म्हणून हा चित्रपट रिव्ह्यू कमिटीकडे पाठवण्यात आला आहे. चित्रपटाचा विषय देवासंबंधित असल्याने लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नये ,म्हणून याचा रिव्ह्यू काळजीपूर्वक केला जाणार आहे.

‘ओह माय गॉड २’ (OMG 2) चित्रपटामध्ये अक्षय कुमार,अभिनेते पंकज त्रिपाठी आणि अभिनेत्री यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात अक्षय कुमारने गळ्यात रुद्रक्षाची माळ,केसांच्या जटा असा लुक केला असून तो काहीसा भगवान शंकरप्रमाणे दिसत आहे.या चित्रपटही अक्षयचा हटके लुक पाहून प्रेक्षक या चित्रपटासाठी फार उत्सुक आहेत.मात्र, आता सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप नोंदवला आहे. यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, असे सेन्सॉर बोर्डाच्या (Censor Board) सदस्यांचे म्हणणं आहे.दरम्यान ११ जुलै ला गदर २ देखील रिलिज होणार असून अमित राय दिग्दर्शित ‘ओएमजी २’ (OMG 2) या चित्रपटाची टक्कर सनी देओलच्या ‘गदर २’सोबत पाहायला मिळणार आहे. या दोन्ही चित्रपटांबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत.

हे ही वाचा:

अब्दुल सत्तार यांच्या अडचणीमध्ये वाढ

भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू तुम्हाला माहित आहे का? तेंडुलकर, कोहली आणि विराटला सुद्धा टाकले मागे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss