spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Shiv Chhatrapati राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर, ३ वर्षांच्या पुरस्कारांची घोषणा

स्नेहलने वाई येथे चंद्रकांत भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्चरीचे प्रशिक्षण घेतले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने आर्चरी खेळातील एकेक यश पादाक्रांत केले.

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजावलेल्यांचा सन्मान राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. राज्य शासनाकडून दिला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आज डिंक १४ जुलै रोजी जाहीर करण्यात आला आहे. मागील ३ वर्षांचे क्रीडा पुरस्कार आज जाहीर करण्यात आले आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेवून क्रीडा पुरस्काराची नावे जाहीर केली.

आज गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेतली आहे यावेळी महाजन म्हणाले ,राज्यात क्रीडा संस्कृतिचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या क्रीडा महर्षि, मार्गदर्शक, खेळाडू, यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारांमध्ये उल्लेखलेल्या तिन्ही वर्षांतील पुरस्कारांमध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरवर पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), साहसी पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) या विभागांचा समावेश आहे.

सन २०१९ -२० मधील क्रीडा पुरस्कार ठाण्यातील श्रीकांत शरदचंद्र वाड यांना देण्यात आला आहे. तर २०२१ – २२ मधील जीवन गौरव पुरस्कार मुंबईचे आदिल जहांगिर सुमारीवाला यांना जाहीर करण्यात आला आहे. साताऱ्याच्या स्नेहल विष्णू मांढरे (Snehal Mandhare) हिला राज्य शासनाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर केला आहे. आर्चरी खेळात उत्तुंग कामगिरी करणा-या स्नेहलला सन २०१९-२० या कालावधीतील पुरस्कार जाहीर झाला आहे.

स्नेहलने वाई येथे चंद्रकांत भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्चरीचे प्रशिक्षण घेतले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने आर्चरी खेळातील एकेक यश पादाक्रांत केले. आचारपणामुळे ती काही काळ खेळापासून दूरावली गेली हाेती. परंतु तिने जिद्दीने आजारावर मात करीत खेळातील नैपुण्य सिद्ध केले. स्नेहल मांढरेने विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत कम्पाऊंडच्या वरिष्ठ संघासाठी कामगिरी बजावली आहे. तिला शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाल्याने तिच्या यशाचे वाई तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.

हे ही वाचा:

भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू तुम्हाला माहित आहे का? तेंडुलकर, कोहली आणि विराटला सुद्धा टाकले मागे

पंतप्रधान मोदी दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यावर

अशोक मामांबद्दल खुद्द निवेदिता सराफ यांनी केला खुलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss