spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बिहारमध्ये राजकीय अस्थिरता; नितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

त्यामुळे भाजप आणि जेडीयूच्या युतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत

महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये देखील आता विविध राजकीय घडामोडींना आता उधाण येत. शिंदे – फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर जवळपास ४० दिवसांनी महाराष्ट्रात झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे भाजपामध्ये जल्लोषाचं वातावरण दिसून येत होत. मात्र, दुसरीकडे बिहारमध्ये सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे भाजपमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण आता निर्माण झाले होते आणि त्यातच आता बिेहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी आपला राजीनामा त्यांच्याकडे सोपवला. . नितीश कुमार यांच्या जेडीयूने एनडीएसोबतची युती तोडत भाजपाला मोठा धक्का दिला होता. त्यानंतर आता नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपाला दुसरा मोठा धक्का बसला आहे.

आज नितीश कुमारांच्या घरी खासदार आणि आमदारांची बैठक झाली होती. या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे. बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूची युती तुटल्यानंतर आता बिहारमध्ये जेडीयू आणि लालूप्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल यांच्या सहकार्याने नवीन सरकार स्थापन होणार असल्याची माहिती मिळत आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार स्थापन होणार असल्याची माहिती मिळत आहे. या सरकारला काँग्रेसने आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. या नव्या सरकारमध्ये नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील अशीही माहिती आहे.

दोन वर्षांपूर्वीच भाजपा आणि जेडीयू पक्षाने युती केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि भाजपामध्ये सुरु असलेला वाद शिगेला पोहचला होता. अखेर नितीश कुमारांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत बिहारमध्ये राजकीय भूकंप घडवून आणला आहे. नुकत्याच पार पडलेल्या नीति आयोगाच्या बैठकीला आणि त्यानंतर मागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीतही नितीश कुमार दुसऱ्यांदा गैरहजर राहिले होते. त्यामुळे भाजप आणि जेडीयूच्या युतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत, नितीश कुमार यांनी भाजप आणि जेडीयूची युती तोडली आहे आणि आपल्या मुख्यमंत्रीपदाचा देखील राजीनामा दिला आहे.

Latest Posts

Don't Miss