spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अजित पवार गट आणि शरद पवार समर्थक आमदार एकत्र बसणार का ?

शिवसेनेच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा गट सत्तेत आल्याने सत्ताधारी वरचढ ठरणार, की विरोधक वरचढ ठरणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

शिवसेनेच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा गट सत्तेत आल्याने सत्ताधारी वरचढ ठरणार, की विरोधक वरचढ ठरणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक गोष्टींवरून कोंडीत पकडू शकतात. तसेच आजपासून पावसाळी अधिवेशन सुरु होणार असल्याने काहि महत्वाच्या पमुद्द्यानावर विरोधकांकडून प्रहार केला जाऊ शकतो. त्यामध्ये राज्यात पुरेसा पाऊस न झाल्याने अडचणीत आलेला शेतकरी, महागाई यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. अशातच आता सत्तेतही राष्ट्रवादीचे नेते आहेत तर विरोधक म्हणूनही राष्ट्रवादीचे नेते असणार आहेत. तर विधिमंडळातील राष्ट्रवादी कार्यालयात अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

अजित पवार गट आणि शरद पवार गट याना वेगळेवेगळे कार्यालय देण्यात आले नाहीत. पक्ष कार्यालय पहिलेच असून त्यात शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे. तर दरवाजावर विधानसभा प्रतोद अनिल पाटिल यांच्या नावाची पाटी आहे. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर काही आमदारांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. तर काही आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. अशातच विधिमंडळातील राष्ट्रवादी कार्यालयात अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अजित पवार गट आणि शरद पवार गट यांना वेगळेवेगळे कार्यालय देण्यात आले नाहीत. त्यामुळे दोन्ही बाजूचे नेते एकत्रित बसणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे हे पाहणे महत्वाचे तारणावर आहे की , अजित पवार आणि त्यांच्या सोबत असलेले राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे.

हे अधिवेशन १७ जुलै ते १४ऑगस्ट दरम्यान चालणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सभागृहातले चित्र कसे असणार? राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांना धारेवर धरणार? याकडेही राज्याचे लक्ष लागले आहे. सकाळी ११ वाजता विधानसभा तर दुपारी १२ वाजता विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे.तर राष्ट्रवादीतील फुटीनंतर कोणत्या गटाकडे किती आमदार आहेत हे समोर आलेलं नाही. अजित पवार गटाने आपल्यासोबत ४०पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. तर जयंत पाटील यांनी आमच्याकडे १९आमदार असल्याचे म्हटले आहे.तर ९ मंत्री वगळता इतर आमदारांची विरोधी पक्षात बसण्याची व्यवस्था करावी असं पत्र जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे. त्यामुळे कोणाच्या गटात किती आमदार हे आज स्पष्ट होणार आहे. जितेंद्र आव्हाडांनी व्हीप जारी केला आहे.

हे ही वाचा:

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दुसरा कसोटी सामना २० जुलैपासून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss