spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शरद पवारांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी विधानसभा अधिवेशनातील अनुपस्थितीचे सांगितले ‘हे’ कारण

तसेच पुढे आमदार तुपे यांनी म्हंटल आहे की, आपला हा संवाद होतोय तो नोबेल हॉस्पिटलधून. आज राज्याच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे.

काही दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप केला. अजित पवारांच्या या बंडामुळे राष्ट्रवादी पक्ष हा दोन गटांमध्ये विभागला गेला. एक म्हणजे अजित पवार गट आणि दुसरा म्हणजे शरद पवार गट. अजित पवार यांनी काही आमदारांना हाताशी धरत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. बहुतांश आमदारांनी ते कोणत्या गटात आहेत ते जाहीर केलं आहे. परंतु काही आमदारांबाबत अजूनही संभ्रम आहे. अशातच आज शरद पवारांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी विधानसभा अधिवेशनाला अनुपस्थिती का लावली? ते स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर हडपसरचे आमदार चेतन तुपे (Chetan Tupe) यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यांनी अजित पवारांची भेट घेतल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे ते नेमके कोणत्या गटात आहेत याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. अशातच प्रकृती बरी नसल्याने आज ते विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अनुपस्थित होते. दरम्यान, त्यांनी ट्विटरवर स्वतःचा एक व्हिडीओ शेअर करून आपल्या गैरहजेरीचं कारण स्पष्ट केलं आहे.या ट्वीटमध्ये आमदार तुपे यांनी म्हटलं आहे की, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आमदार झाल्यापासून एकाही अधिवेशनाला अनुपस्थित राहिलो नाही. प्रत्येक अधिवेशनात प्रचंड ताकदीने लोकांचे प्रश्न मांडले आहेत. प्रसंगी आंदोलने केली, भांडलो पण नागरिकांच्या प्रश्नांसाठी लढण्याची भूमिका सोडली नाही. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे मला उपस्थित राहता येणार नाही. याचं प्रचंड वाईट वाटत आहे. विधानसभा खूप जास्त मिस करतो आहे. त्याहीपेक्षा अनेकांनी भेटून आपल्या समस्या सांगितल्या होत्या त्या पहिल्या दिवशी मांडता येणार नाहीत याचे दुःख आहे. पण लवकरच उपचार घेऊन अधिवेशनाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या सर्वांची साथ राहूदे.

तसेच पुढे आमदार तुपे यांनी म्हंटल आहे की, आपला हा संवाद होतोय तो नोबेल हॉस्पिटलधून. आज राज्याच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे. परंतु माझी प्रकृती बरी नसल्याने गेले काही दिवस मी रुग्णालयात उपचार घेत आहे. अजूनही काही दिवस उपचार घ्यावे लागतील अशी परिस्थिती आहेत. डॉक्टरांनी मला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे, मला अधिवेशानाच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजाची उणीव जाणवतेय. या सगळ्याला मी मिस करतोय.

हे ही वाचा:

चेन्नई सुपर किंग्सचा सलामी फलंदाज विजेतेपद जिंकताच अडकला लग्न बंधनात बार्क इंडियाच्या रिपोर्टनुसार Rupali Ganguly ची अनुपमा अव्वल स्थानावर Odisha Train Accident, रेल्वे अपघाताची माहिती देणारी व्यक्ती कोण?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss