spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

१२१ वर्ष जुन्या Cadbury Chocolate चा होणार लिलाव…

तुम्ही अनेक वेगवेगळे प्रकारचे चॉकलेट खाऊन पहिले असतील,बाजारातही अनेक प्रकारचे चॉकलेट उपलब्ध असते. पण तुम्ही कधी १२१ वर्ष जुने चॉकलेट पहिले किंवा खाल्ले आहे का?

चॉकलेट खायला कोणाला आवडत नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळयांना चॉकलेट खायला फार आवडते. जगभरातील अनेक भागात कॅडबरीला पसंदी आहे. तुम्ही अनेक वेगवेगळे प्रकारचे चॉकलेट खाऊन पहिले असतील,बाजारातही अनेक प्रकारचे चॉकलेट उपलब्ध असते. पण तुम्ही कधी १२१ वर्ष जुने चॉकलेट पहिले किंवा खाल्ले आहे का?

आता १०० वर्षाहूनही जास्त काळ जुन्या कॅडबरी चॉकलेटचा लिलाव करण्यात येत आहे. हे चॉकलेट १९०२ मध्ये तयार करण्यात आले होते. आता १२१ वर्ष जुन्या या कॅडबरी चॉकलेटचा लिलाव करण्यात येणार आहे. हे चॉकलेट त्यावेळी एका खास कारणानिमित्त बनवण्यात आले होते. १२१ वर्ष जुने हे कॅडबरी चॉकलेट किंग एडवर्ड (King Edward VII) आणि राणी अलेक्झांड्रा (Queen Alexandra) यांच्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ १९०२ मध्ये तयार करण्यात आले होते. तब्बल १०० वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर आता या खास कॅडबरी चॉकलेटचा लिलाव करण्यात येणार आहे. कॅडबरी ही एवढी जुनी कंपनी आहे, हे अनेकांना माहीतही नसेल. १९०२ मध्ये जेव्हा एका ९ वर्षांच्या मुलीला शाळेत हे देण्यात आले तेव्हा तिने खाण्याऐवजी जपून ठेवले होते. आता याचाच लिलाव होणार आहे.

झाले असे की, इंग्लंडचे किंग एडवर्ड (Edward) आणि राणी अलेक्झांड्रा (Alexandra) यांच्या राज्याभिषेकाच्या खास प्रसंगासाठी हे खास कॅडबरी चॉकलेट त्यावेळी बनवण्यात आले होते. त्यावेळी त्याकाळात अनेक लहान मुलांसाठी चॉकलेट खाणे म्हणजे एक स्वप्न होते,कारण त्यावेळी चॉकलेट हे परवडणारे नव्हते. त्यावेळी मुलांना इतके महागडे चॉकलेट मिळणे इतके सोपे नव्हते. १९०२ मध्ये किंग एडवर्ड (King Edward) आणि राणी अलेक्झांड्रा (Alexandra) यांच्या राज्याभिषेकानिमित्त तेथील शाळेतील लहान मुलांना हे खास चॉकलेट देण्यात आले होते. शाळेत शिकणाऱ्या नऊ वर्षांच्या मेरी अॅन ब्लॅकमोरला (Anne Blackmore) हे चॉकलेट मिळाले, तेव्हा तिने ते खाण्याऐवजी जपून ठेवले होते. मेरीनंतर अनेक दशकांपासून त्यांच्या कुटुंबाने ही आठवण जपून ठेवली आहे. पण, आता मेरीच्या नातीने या खास कॅडबरी चॉकलेटचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. मेरीची नात जीन थॉम्पसन (Gene Thompson) आता ७२ वर्षांची आहे. जीन यांनी आता १२१ वर्ष जुन्या या खास कॅडबरी चॉकलेटचा लिलाव करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

हे ही वाचा:

Hidden Forts In Pune,पावसाळ्यात या किल्ल्यांना भेट द्यायला विसरू नका

Rajinikanth च्या ‘हुकुम’ चित्रपटातील गाण्याचा टीझर पाहून चाहते म्हणाले..

श्रावण अधिकमासात काय केले पाहिजे? सविस्तर वाचा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss