spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘मागून येऊन पहिल्या पंगतीत बसले’, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

मुंबई : शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा काल अखेर विस्तार झाला. सकाळी 11 वाजताच्या सुमारास राज्यभवनातील दरबार हॉलमध्ये 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु यात अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यानंतर बच्चू कडू यांनी माध्यमांसमोर बोलता नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपद देतो म्हणून मला शब्द दिला होता, पण तसे झाले नाही त्यामुळे नाराजी व्यक्त करत आहे”, असे त्यांनी सांगितले.

पुढे त्यांनी म्हटले, “थोडी नाराजी आहे, पण एवढी जास्त नाराजी नाही की गट सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ, ही क्षणिक नाराजी आहे. पुढे विस्तार व्हायचा आहे. मी मंत्रिपदासाठी त्यांना पाठिंबा दिलेला नाही. काही मु्द्द्यांवरुन पाठिंबा दिली. जर ते होत नसेल म्हणून तर आम्ही विचार करु. मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलं म्हणून आम्ही मागितलं. जर आश्वासन दिलं नसतं तर आम्ही मागितलंच नसतं. हे राजकारण आहे. इथे दोन आणि दोन चार नाही तर शून्यही असू शकतो.” असे मत कडू यांनी व्यक्त केले.

या पार्श्वभूमीवर आगामी काळात बच्चू कडू यांना मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्यात स्थान मिळतं का आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा : 

शिवसेनाला मोठा दिलासा ! विधान परिषदेत विरोधीपक्ष नेतेपदी अंबादास दानवेंची नियुक्ती

Latest Posts

Don't Miss