spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जाणून घ्या ! शरीरातील पाण्याचे महत्व…

सध्या पावसाचे वातावरण आहे आणि गर हवा देखील आहे. त्यामुळे साहस तहान हि जास्त लागत नाही. परंतु पाणी शरीरासाठी महत्वाची भूमिका बजावते.

मुंबई :- सध्या पावसाचे वातावरण आहे आणि गार हवा देखील आहे. त्यामुळे सहसा तहान हि जास्त लागत नाही. परंतु पाणी शरीरासाठी महत्वाची भूमिका बजावते. एक ग्लास सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी खूप लाभदाक असते. तुम्ही ताजे तवाण होता आणि दिवसभर फ्रेश राहता. तसेच त्यामुळे पोट साफ राहते. पाणी प्यायल्याने त्वचा कोरडी पडत नाही. दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पोटात गेलेच पाहिजे. मात्र, गरम पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी अधिक लाभदायक आहे. कोमट पाण्यात मध आणि लिंबू टाकून प्यायल्यास टॉक्सिक एलिमेंट शरीरातून बाहेर टाकण्यास मदत होते. दिवसभरातून ३-४ लीटर पाणी आपल्या शरीरात जाणं अत्यंत महत्वाचं आहे.

  • अनेकदा ब्रश न करता पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. थोडंस हे विचित्र वाटेल पण उठल्यावर फक्त चूळ भरून पाणी पिणं हे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतात. ब्रश करण्यापूर्वी पाणी पिऊन दिवसाची सुरूवात केल्यास शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. रोज सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने पोट साफ होण्यास मदत होते. सोबतच बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडीटी (पित्त) अशा समस्या आटोक्यात राहण्यास मदत होते.
  • रोज सकाळी ग्लासभर पाण्याने दिवसाची सुरूवात केल्याने शरीराचे मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते. यामुळे पोटावरील चरबी कमी होते. वजन घटवण्यास मदत होते.
  • तुम्हाला जास्त प्रमाणात चहा, कॉफी घेण्याची सवय असल्यास ग्रीन टी प्यावा. एनर्जी मिळते.
  • पाणी प्यायल्याने शरीरातील जळजळ होण्याचे प्रमाण कमी होते.
  • आपली पचनक्रिया एकदम नाजूक असेल तर गरम पाणी पिणे कधीही चांगले. तसेच तुम्ही वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पिणे महत्वाचे आहे. तसेच कोमट पाणी प्यायल्यास पित्त व कफ दोष होत नाही.
  • महिलांना मासिक पाळीच्यावेळी पोटात दुखत असेल तर तेव्हा थंड पाणी पिण्याऐवजी गरम पाणी प्या. त्यामुळे पोट दुखीवर आराम मिळतो.
  • तुम्हाला नेहमी सर्दीचा त्रास होत असेल तर गरम पाणी पिणे नेहमी चांगले. गरम पाणी पिल्यानंतर गळाही साफ आणि चांगला राहतो. सादी सर्दी असेल तर गरम पाण्याने आराम मिळतो.
  • सकाळी पाणी पिल्यामुळे गळा, डोळे, लघवी, किडनी बाबत ज्याकाही समस्या असतील त्या दूर होण्यास मदत होते .
  • गरम पाणी पिण्यामुळे वाढते वय लवकर लक्षात येत नाही. याचे कारण की गरम पाण्यामुळे अशुद्धपणी बाहेर पडतो. त्यामुळे वाढते वय लक्षात येत नाही.
  • डोकेदुखी होण्याचे मुख्य कारण पाणी कमी पिणे होउ शकते यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिल्याने डोकेदुखीची समस्या दुर होउ शकते.
  • पाणी पिण्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते त्यामुळे हदयासंबंधी रोगनियंत्रित ठेवण्यास मदत मिळते योग्य प्रमाणात पाणी पिण्यामुळे ह्नदयविकाराचा धक्का येण्याच्या शक्यता कमी होतात.
  • गरम पाणी पिण्यामुळे पचन क्रिया चांगली राहते. त्यामुळे गॅसची समस्या दूर होते

हे ही वाचा :- 

तुम्ही सतत एसीमध्ये बसता… ? तर हे नक्की वाचा

Latest Posts

Don't Miss