spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Shoaib Akhtar : शोएब अख्तरवरील शस्त्रक्रिया पूर्ण, भावूक होऊन व्हिडिओ केला शेअर

मुंबई : पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शोएब अख्तर हे गुडघ्याच्या गंभीर दुखापतीशी झुंज देत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. यावेळी शोएबच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर शोएब यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते भावूक झाले आहे.

शोएब यांनी सांगितले की, गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याचे करिअर लवकर संपले. अन्यथा मी आणखी चार-पाच वर्षे खेळू शकलो असतो. असे त्यांनी म्हटले. शोएब यांना गेल्या 10 वर्षांपासून गुडघ्याचा त्रास आहे. आता त्याच्यावर ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शोएब यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. शोएबने चाहत्यांना तो लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shoaib Akhtar (@imshoaibakhtar)

 रावळपिंडी एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेल्या शोएब यांनी 2000 च्या दशकातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज मानला जात होता. त्याच्या गोलंदाजीच्या वेगासमोर अनेक फलंदाज हतबल व्हायचे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रमही शोएबच्या नावावर आहे. शोएबने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 14 टी-20, 163 एकदिवसीय आणि 46 कसोटी सामने खेळले. त्‍याच्‍या नावावर टी-20मध्‍ये 21, एकदिवसीयमध्‍ये 247 विकेट आणि कसोटीमध्‍ये 178 विकेट आहेत.

हेही वाचा : 

जाणून घ्या ! शरीरातील पाण्याचे महत्व…

Latest Posts

Don't Miss