spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Nitish kumar : बिहारमध्ये ‘महागठबंधन’ सरकार स्थापन, नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपत घेतली

मुंबई : बिहारमध्ये आता नव्याने महागठबंधन सरकार स्थापन झाले आहे. जनता दल युनायटेड आणि राजदप्रणित महागठबंधन यांचं संयुक्त सरकार आज स्थापन झाले आहे. यावेळी नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपची साथ सोडत नितीश कुमार यांनी महागठबंधनसोबत नवे सरकार स्थापन केलं आहे. बिहारच्या राजभवनात हा शपथविधी सोहळा बुधवारी दुपारच्या सुमारास पार पडला.

नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळे बिहारमध्ये भाजपला झटका बसला आहे. भाजपने जेडीयू कमकुवत करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत नितीश कुमार यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेत फूट पाडून सत्ता मिळवल्या नंतर मात्र भाजपला बिहारमधली सत्ता मात्र गमवावी लागली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.बिहारमधील महागठबंधनमध्ये जेडीयू, राजद, काँग्रेस, हम आणि वाम दल यांचा समावेश आहे.

शपथविधी सोहळ्यासाठी लालू प्रसाद यादव यांचं संपूर्ण कुटुंब राजभवनात उपस्थित होतं. त्यात राबडी देवी, तेज प्रताप यादव आणि तेजस्वी यादव यांच्या पत्नी राहेल यादव यांचा समावेश आहे. तसेच, लालू प्रसाद यादव मात्र या शपथविधी सोहळ्यासाठी अनुपस्थित होते. त्यांच्यावर सध्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : 

Shoaib Akhtar : शोएब अख्तरवरील शस्त्रक्रिया पूर्ण, भावूक होऊन व्हिडिओ केला शेअर

Latest Posts

Don't Miss