spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

इर्शाळवाडी दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, म्हणाले ‘दोन हेलिकॉप्टर तयार, पण खराब हवामानामुळं टेकऑफ अशक्य… आधी बचाव’

"बचाव कार्य करत असताना अनेक अडथळे येत आहेत. गाव डोंगरावर असल्यामुळे गाडी जाण्याची किंवा इतर साधनं नेण्याची सुविधा सुद्दा नाही. कारण रस्ताच नाहीये.

रायगड (Raigad) जिल्ह्यातील खालापूरच्या इर्शाळवाडीवर (Irshalwadi) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. डोंगराळ भागात असलेल्या इर्शाळवाडीवर डोंगर कोसळल्याने अनेक कुटुंब मलब्याखाली अडकले आहेत. काल बुधवार रात्री १९ जुलै रोजी ही दरड कोसळली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), मंत्री दादा भुसे (Dada Bhuse), मंत्री उदय सामंत (Uday Samant) घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या मुख्यमंत्री घटनास्थळी असून परिस्थितीचा आढावा घेत आहे. मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधून सर्व परिस्थितीची माहिती दिली.

इर्शाळवाडीत झालेल्या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर आतापर्यंत ८० जणांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घटनास्थळाचा आढावा घेऊन माध्यमांशी संवाद साधला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, “रायगडमधील इर्शाळवाडी आहे. या वाडीत जवळपास ४५ ते ४७ घरं आहेत. दरड कोसळल्यामुळे जवळपास १६ ते १७ घरं मलब्याखाली गाडली गेली आहेत. यात आतापर्यंत ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. NDRF, TDRF आणि स्थानिक रेस्क्यू टीम काम करत आहेत.”

“बचाव कार्य करत असताना अनेक अडथळे येत आहेत. गाव डोंगरावर असल्यामुळे गाडी जाण्याची किंवा इतर साधनं नेण्याची सुविधा सुद्दा नाही. कारण रस्ताच नाहीये. त्यामुळे सगळं काम बचाव पथकातील जवानांनाच करावं लागणार आहे. सध्या प्राधान्यानं बचावकार्य सुरू आहे. १५ ते १७ घरं मातीच्या घराखाली आहेत. रात्री दरड कोसळल्याचा आवाज झाल्यानंतर लोकं घाबरून घरातून बाहेर पडली आणि पायथ्याशी आली. त्यामुळे सध्या संपूर्ण आकडा समोर आलेला नाही. परंतु, १५ ते २० लोकं आणखी ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज आहे.” असं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच हवाई मार्गानं बचावकार्य करण्याचा पर्याय विचारधीन आहे. दोन हेलिकॉप्टर तयार आहेत, मात्र खराब हवामानामुळे टेकऑफ करणं शक्य नाही. हवाई दलाशी सातत्यानं संपर्कात आहोत. सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन ज्या-ज्या पद्धतीनं शक्य आहे. त्या-त्या पद्धतीनं बचावकार्य केलं जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

हे ही वाचा:

Mumbai Local मधून प्रवास करणाऱ्यां ज्येष्ठांसाठी खूशखबर, आता…

लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल Gigi Hadid ला अटक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss