spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आशुतोष गोवारीकर करणार ओटीटीवर पदार्पण

बॉलीवूडमधील(Bollywood) आघाडीचे दिग्दर्शक(Director) व निर्माते(Producers) आशुतोष गोवारीकर(Ashutosh Gowariker) आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) पदार्पण करणार असल्याचं समोर आलं आहे. ‘लगान’(Lagan), ‘जोधा अकबर’(Jodha Akbar) , ‘पानीपत’(Panipat), ‘स्वदेश’(Swadesh) यांसारखे दमदार चित्रपट तयार करणारे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते आशुतोष गोवारीकर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

बॉलीवूडमधील(Bollywood) आघाडीचे दिग्दर्शक(Director) व निर्माते(Producers) आशुतोष गोवारीकर(Ashutosh Gowariker) आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) पदार्पण करणार असल्याचं समोर आलं आहे. ‘लगान’(Lagan), ‘जोधा अकबर’(Jodha Akbar) , ‘पानीपत’(Panipat), ‘स्वदेश’(Swadesh) यांसारखे दमदार चित्रपट तयार करणारे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते आशुतोष गोवारीकर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. पण, एक उत्कृष्ट दिग्दर्शक किंवा निर्माते म्हणून नाही, तर एक अभिनेते(Actor) म्हणून ओटीटीवर पाहायला मिळणार आहे.

‘काला पानी’(Kala Pani) या वेब सीरिजमधून(Web series) आशुतोष गोवारीकरांचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे. नेटफ्लिक्सनं(Netflix) पोशम पा पिक्चर्स(Posham Pa Pictures) व समीर सक्सेना(Sameer Saxena) यांच्या या नव्या सीरिजची नुकतीच घोषणा केली आहे. ‘काला पानी’च्या दिग्दर्शनाची धुरा समीर सक्सेना आणि अमित गोलानी यांनी सांभाळली आहे; तर बिस्वपती सरकार, निमिषा मिश्रा, संदीप साकेत आणि अमित गोलानी यांनी या सीरिजचं लिखाण केलं आहे. ही वेब सीरिज एका अशा समाजावर आधारित आहे, जो समाज नैसर्गिक संकटातून वाचण्यासाठी प्रयत्न करत असतो. मानव आणि नैसर्गिक संकट यांच्यामधली अदृश्य लढाई या सीरिजमधून पाहायला मिळणार आहे. ‘काला पानी’ या सीरिजमध्ये आशुतोष गोवारीकर यांच्याव्यतिरिक्त मोना सिंह, अमेय वाघ, सुकांत गोयल, अरुशी शर्मा, राधिका मेहरोत्रा आणि विकास कुमार आहे.

दरम्यान, आशुतोष गोवारीकर यांनी आपल्या करिअरची सुरुवात अभिनयापासूनच केली होती. १९८४ साली केतन मेहता दिग्दर्शित ‘होली’ या चित्रपटात त्यांनी अभिनेता म्हणून पहिलं काम केलं होतं. याच चित्रपटाच्या सेटवर गोवारीकर यांची भेट आमिर खानशी झाली. त्यानंतर त्यांनी टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केलं. तसेच २०१६ साली प्रदर्शित झालेल्या प्रियांका चोप्रा निर्मित ‘व्हेंटीलेटर’(Ventilator) चित्रपटातही त्यांनी राजा कामेरकर हे पात्र साकारलं होतं.

हे ही वाचा:

अमोल मिटकरी यांनी असे केले ट्विट …

कस्टमची आजवरची सर्वात मोठी कारवाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना हटवणे भाजपला महागात पडेल? BJP will pay cost if Shinde remove from post

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss