spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गणपती स्पेशल रेसिपी: घरीच बनवा बाप्पासाठी मोदक

दरवर्षीप्रमाणेच यावर्षीसुध्दा गणेश चतुर्थी १९ सप्टेंबरला साजरा करण्यात येणार आहे. १९ सप्टेंबरला बरेच लोक गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करतील आणि पुढील १० दिवस गणेशोत्सव धुमधुमात साजरा करण्यात येईल. आपण सर्वचजण जाणून आहोत की मोदक हा गणपतीचा सर्वात जास्त आवडीचा भोग आहे.

दरवर्षीप्रमाणेच यावर्षीसुध्दा गणेश चतुर्थी १९ सप्टेंबरला साजरा करण्यात येणार आहे. १९ सप्टेंबरला बरेच लोक गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करतील आणि पुढील १० दिवस गणेशोत्सव धुमधुमात साजरा करण्यात येईल. आपण सर्वचजण जाणून आहोत की मोदक हा गणपतीचा सर्वात जास्त आवडीचा भोग आहे. सामान्यतः सर्वच भाविक हा भोग गणपती बाप्पाला अर्पण करतात. पण बऱ्याच लोकांना मोदक प्रसाद पेढा देखील खूप आवडतो. खास करुन लहान मुलांनां तो फार आवडतो. गणपतीच्या दिवसांत आरतीनंतर प्रसाद म्हणून बरेच जण हा मोदक प्रसाद पेढा देतात. आपण हा प्रसाद दरवेळी दुकानातून किंवा स्टोरमधून विकत घेत असतो, परंतु हा प्रसाद आपण घरच्याघरी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. चला तर मग जाणून घेऊ या मोदक प्रसाद कसा बनवायचा ते..

साहित्य –

१/२ कप बेसन

१ कप बारीक रवा

१/२ टिस्पून वेलचीपूड

१ कप साखर

१/२ कप पाणी

४ टिस्पून तूप

ड्रायफ्रुट (आवडीनुसार)

कृती-

सर्वात प्रथम आधी रवा मंद आचेवर कोरडाच भाजून घ्या.त्यानंतर त्याला गुलाबीसर रंग येऊ द्या. भाजताना सतत एकसारखे आणि हलवत राहा. रवा भाजून झाल्यावर परातीत काढून ठेवा. त्याच कढईत तूप घालून, मंद आचेवर बेसन खमंग भाजून घ्या. बदाम काजूचे काप घाला म्हणजे बेसन सोबत तेही छान तुपात भाजले जातील.दुसर्‍या पातेल्यात एक कप साखर आणि अर्धा कप पाणी घालून एकतारी पाक करुन घ्या. नंतर एकतारी पाक करण्यासाठी साखर पाणी एकत्र करा. त्याला नीट एक उकळी येऊ द्या. उकळी आली कि मिश्रण फेसाळेल आणि फेस कमी झाला कि अर्ध्या मिनीटात लगेच गॅस बंद करा आणि हा पाक ,रवा आणि बेसनाच्या मिश्रणात घाला. कालथ्याने ढवळून घ्या आणि नीट झाकून ठेवा. १५-२० मिनीटांनी मिश्रण ढवळून घ्या. त्यांनतर वेलचीपूड घाला. हळू हळू मिश्रण आळेल.मोदक वळण्याइतपत घट्ट झाले कि लगेच मोदकाच्या साच्यात तयार मिश्रण घालून छान मोदक करुन घ्या. हे मोदक ८-१० दिवस छान टिकतात.

हे ही वाचा:

“त्यांच्याबद्दल” गुलाबराव पाटील म्हणाले…

आशुतोष गोवारीकर करणार ओटीटीवर पदार्पण

कस्टमची आजवरची सर्वात मोठी कारवाई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss