spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

समृद्धी महामार्गावरील टोल प्रकरणावर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले “साहेबांमुळे ६५ टोलनाके बंद झाले…

"अमित ठाकरे याचा फास्टटॅग ब्लॅकलिस्टेड झाला होता. पण टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांना अमित ठाकरेंची गाडी असल्याचं लक्षात आलं नाही.

मुंबई ते नागपूरला (Mumbai – Nagpur) जोडणारा समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) हा नुकताच चालू झाला आहे. हा मार्ग चालू झाल्या पासून इथे अपघातांचे सत्र हे सुरूच आहे. अशातच नुकतीच समृद्धी महामारवावरील एक महत्वाची अपडेट ही समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर (Nashik , Sinner) तालुक्याजवळ समृद्धी महामार्गावर एक टोल नाका आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचा ताफा हा या टोलनाक्यावर अडवण्यात आला त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी या टोलनाक्याची तोडफोड केली. या सर्व प्रकारणा नंतर आता अमित ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अमित ठाकरे म्हणाले की, रात्री साईबाबांच दर्शन घेतल्यानंतर मला नाशिकला काम असल्याने मी नाशिककडे निघालो. सिक्युरिटी दिवसभर बरोबर असल्याने त्यांना शिर्डीचा थांबायला सांगितलं. कोपरगावहून समृद्धी महामार्गावरुन नाशिककडे निघालो आणि सिन्नरजवळ असलेल्या एक्झिटला माझी गाडी थांबवली. गाडीला फास्टॅग असतानाही तो रॉड खाली आला. तो टोलनाक्याचा काहीतरी टेक्निकली प्रॉब्लेम होता. माझ्या सहकाऱ्याने ने त्यांना फास्टॅगबाबत विचारलं तर त्यांनी आमचे काही इश्यूज आहेत असं आम्हाला सांगितलं. टोलनाक्यावरील कर्मचारी सुद्धा अत्यंत उद्धट होते. तर मॅनेजरला त्यांनी फोन केला तेव्हा तो सुद्धा तशाच भाषेत बोलत असल्याचं दिसलं. दहा मिनिटे थांबवल्यावर मला त्या ठिकाणाहून सोडण्यात आलं आणि मी नाशिकला हॉटेलवर पोहोचलो तेव्हा कळलं की टोलनाका फोडण्यात आला आहे. साहेबांमुळे ६५ टोलनाके बंद झाले, माझ्यामुळे आज अजून एक ऍड झाला, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी स्मितहास्य करत दिली आहे.

दरम्यान याबाबत पोलिसांनी माहिती देताना म्हटलं की, “अमित ठाकरे याचा फास्टटॅग ब्लॅकलिस्टेड झाला होता. पण टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांना अमित ठाकरेंची गाडी असल्याचं लक्षात आलं नाही. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास मनसेचे कार्यकर्ते टोलनाक्यावर जमले. पण पोलिसांचं पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं. आम्ही कार्यकर्त्यांना प्रकार नीट समजावून सांगितलं. त्यांनतर कार्यकर्ते कोणताही गोंधळ न घालता तिथून निघाले. टोलनाक्याच्या अधिकाऱ्यांनी देखील याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. आम्ही इथे त्यानंतर दोन तास होतो. पण अचानक रात्री काही कार्यकर्ते आले आणि त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. ही बातमी मिळाल्यानंतर आम्ही पुन्हा टोलनाक्यावर आलो. पण सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. कोणत्याही प्रकारच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. तक्रार नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यानंतर योग्य ती कारवाई करु.”

हे ही वाचा:

अश्विनने या खेळाडूला मागे टाकत केला नवीन विक्रम

पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध , आंदोलन

गणपती स्पेशल रेसिपी: घरीच बनवा बाप्पासाठी मोदक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss