spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तारीख पे तारीख! शिंदे – ठाकरे वादाची सुनावणी 10 दिवसांनी लांबली…

या सगळ्या मुद्द्यांवर होणारी सुनावणी 10 दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.

मुंबई: सव्वा महिना लोटल्यानंतर अखेर काल (९ ऑगस्ट) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाच्या विस्ताराचा शपथविधी पार पडला आहे. शिंदे गटातून ९ आणि भाजपमधून ९ अशा एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये (Supreme Court) सुनावणी सुरू असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याचं सांगण्यात येत होतं, पण शिंदे आणि फडणवीस यांनी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबंध नसल्याचं सांगितलं. आता सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीबाबत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.

सर्वांचेच लक्ष हे १२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या न्यायालयाच्या सुनावणीकडे होते मात्र, आता शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंची का एकनाथ शिंदेंची? महाराष्ट्रात स्थापन झालेलं सरकार कायदेशीर का बेकायदेशीर? 16 आमदारांच्यावर अपात्रतेच्या टांगत्या तलवारीचं काय? सत्तास्थापनेत राज्यपालांची भूमिका योग्य का अयोग्य? निवडणूक आयोगासमोर सुरू असलेला शिवसेनेचा वाद, या सगळ्या मुद्द्यांवर होणारी सुनावणी 10 दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.

ही सुनावणी आधी 8 ऑगस्टला होणार होती, यानंतर ही सुनावणी 12 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली, पण आता या प्रकरणाची सुनावणी 22 ऑगस्टपर्यंत लांबणीवर पडली आहे.भारताचे मुख्य न्यायाधीश रमण्णा यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू आहे. त्यातच रमण्णा हे 26 ऑगस्टला निवृत्त होत आहेत, त्यानंतर उदय लळीत हे देशाचे नवे सरन्यायाधीश होतील.त्यामुळे शिंदे विरुद्ध ठाकरे ही लढाई नक्की मुख्य न्यायाधीश रमण्णा यांच्या खंडपीठापुढे निकाली लागते कि लळीत यांच्याकडे हे पाहणे आता मह्त्वाचे ठरणार आहे.

Latest Posts

Don't Miss