काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shide) यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी सहकुटुंब पंतप्रधानांची भेट घेतली. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या भेटीनंतर काही फोटो आणि एक ट्विट मुख्यमंत्र्यांनी शेअर केले आहे. त्यानंतर याचसंदर्भामध्ये पंतप्रधान मोदी यांनी भेटीसाठी वेळ काढल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. पंतप्रधान मोदी यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्वीट रिट्वीट करत मुख्यमंत्र्यांचा कौतुक केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो ट्वीट करत लिहिलं की, ”देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या मा. @narendramodi जी यांनी आज माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार @DrSEShinde, सून आणि नातू यांच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपणाने विचारपूस केली. माझ्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला. असे ट्विटमध्ये लिहिले आहे. गेले वर्षभर केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ राज्य सरकारला मिळत आहे. ते सहकार्य यापुढेही कायम मिळो, ही मागणी मान्य करत पंतप्रधानांनी आश्वस्तही केले. पंतप्रधानांची आपुलकी, आशीर्वादाचा हात आणि आस्था नवे बळ देणारी आहे.
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, ”महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतुकास्पद आहे.”
हे ही वाचा:
अश्विनने या खेळाडूला मागे टाकत केला नवीन विक्रम
पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध , आंदोलन
गणपती स्पेशल रेसिपी: घरीच बनवा बाप्पासाठी मोदक