spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्याच आमदारांना निधी दिला नाही, देवेंद्र फडणवीस

सध्या राजकारणामधील अनेक समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंड करून अजित पवार पक्षातील काही आमदारांसोबत सत्तेमध्ये सामील झाले आणि उपमुख्यमंत्री पदाची त्याचबरोबर सत्तेमध्ये सामील झालेल्या मंत्र्यांनी देखील मंत्री पदाची शपथ घेतली.

सध्या राजकारणामधील अनेक समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंड करून अजित पवार पक्षातील काही आमदारांसोबत सत्तेमध्ये सामील झाले आणि उपमुख्यमंत्री पदाची त्याचबरोबर सत्तेमध्ये सामील झालेल्या मंत्र्यांनी देखील मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्याकडे अर्थखाते देण्यात आले आहे. आता अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांना भरघोस निधी देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अजित पवार यांनी केवळ राष्ट्रवादीच्याच आमदारांना निधी दिला नाही. शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनाही दिला आहे. इतरही काही आमदारांना निधी दिला आहे. त्यामुळे केवळ राष्ट्रवादीच्याच आमदारांना निधी दिला असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी फडणवीस यांनी राज्यातील विविध भागांमध्ये सध्या सातत्याने होत असलेल्या अतिवृष्टीबाबत माहिती दिली. काही ठिकाणी पंधरा दिवसात जेवढा पाऊस होतो, तेवढा दोन-तीन दिवसांत पडत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत आहे.

अतिवृष्टीमुळे बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. सगळीकडे अलर्ट दिलेला आहे. वेदर अलर्ट सुद्धा दिले जात असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. दरम्यान अतिवृष्टी होणार, अशी माहिती मिळताच प्रशासन काळजी घेत आहे. रेस्क्यू ऑपरेशन चाललेले आहे. ज्या ज्या ठिकाणी अलर्ट मिळत आहे. तिथे प्रशासनाला पूर्णपणे अलर्टवर ठेवत आहोत, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

हे ही वाचा:

भारतासाठी तिसरा दिवस ठरला कठीण, वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचे उत्तम प्रदर्शन

समृद्धी महामार्गावरील टोल प्रकरणावर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले “साहेबांमुळे ६५ टोलनाके बंद झाले…

समृद्धी महामार्गावरील टोल प्रकरणावर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले “साहेबांमुळे ६५ टोलनाके बंद झाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss