spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिल्यांदाच अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेत्यांनी घेतली उध्दव ठाकरेंची भेट

आज राष्ट्रवादीचे नेते हे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्री या निवासस्थानी दाखल

मुंबई:महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या महिन्यात अनेक घटना घडून गेल्या. नेत्यांची बंडखोरी, युती, सत्तांतर अशा अनेक गोष्टी याच काळात घडल्या. गेल्या महिन्याभरापूर्वीच महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि राज्यात एकनाथ शिंदे (Cm Ekanth Shinde) आणि भाजप युतीचं नवं सरकार तयार झालं.पण तरीसुद्धा शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोणतीही हालचाल केली नव्हती. राष्ट्रवादीचे बरेच नेते हे संजय राऊतांच्या (Sanjay Raut) अटकेवरही मौनात दिसून आले. मात्र आता सत्तांतर त्यानंतर झालेला मंत्रिमंडळ विस्तार आणि गेल्या काही दिवसांपूर्वी झालेली संजय राऊत यांची अटक अशा अनेक मोठ्या घडामोडी घडल्यानंतर आज राष्ट्रवादीचे नेते हे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्री या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यामुळे मातोश्रीवर नक्की काय खलबतं सुरु आहेत? असा प्रश्न आता निर्माण होतोय.

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहलेल्या नेत्यांमध्ये विरोधी पक्ष नेते अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील आणि सुनील तटकरे मातोश्री येथे दाखल झाले आहेत. ही भेट सदिच्छा भेट आहे,नेत्यांकडून असं सांगण्यात जरी येत असलं तरी मंत्रिमंडळविस्तारानंतर हि भेट झाल्यामुळे या भेटीला आता एक राजकीय महतव प्राप्त झालं आहे.

कोणत्या मुद्द्यावर चर्चेची शक्यता?

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून उद्धव ठाकरे यांना एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अनेक निर्णय जात आहेत. त्याचं सर्वात मोठा कारण म्हणजे दोन तृतीयांश आमदारांची संख्या ही एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. हा वाद सध्या सुप्रीम कोर्टात हे सुरू आहे. सुप्रीम कोर्टातल्या या वादावरती या बैठकीत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तार आणि येणारे अधिवेशन याबाबत ही या बैठकीत खलबत्तं होऊ शकतात. तसेच शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत हे सध्या ईडी कोठडी मुक्कामी आहेत. संजय राऊत यांना अटक झाल्यापासून शरद पवार यांची ही प्रतिक्रिया आली नव्हती. त्यानंतर आज या बैठकीत राहतांबद्दल ही चर्चा होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या या भेटीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

Latest Posts

Don't Miss