spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रोहित पवार एकटेच बसले आंदोलनाला

रोहित पवार कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसीला मंजुरी मिळाली पाहिजे म्हणून आंदोलन सुरू केले आहे. एमआयडीसीला मंजुरी मिळाण्याच्या मुद्द्यांवरून रोहित पवार हे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ आंदोलनाला बसले आहेत

रोहित पवार कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसीला मंजुरी मिळाली पाहिजे म्हणून आंदोलन सुरू केले आहे. एमआयडीसीला मंजुरी मिळाण्याच्या मुद्द्यांवरून रोहित पवार हे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ आंदोलनाला बसले आहेत.कर्जत जमखेडचे आमदार रोहित पवार यांनी विधानभवन परिसरात पावसात एकट्यांनी आंदोलन सुरू केले आहे. विधानभवन परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ ते आंदोलनाला बसले आहेत.

कर्जत जामखेड मतदारसंघात पाटेगाव खंडाळा या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रस्तावित आहे. या औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना जाहीर करून या संदर्भातील बाबी पूर्ण करण्याकरिता उद्योग मंत्र्यांशी रोहित पवार यांनी पत्रव्यवहार केला. मात्र लवकर अधिसूचना काढण्याचे आश्वासन दिलं आहे. आता शासन स्तरावर कारवाई होत नसल्याने रोहित ओवर विधान भवनातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याखाली आंदोलन करत आहेत.अधिसूचना तातडीने जाहीर व्हावी अशी त्यांची मागणी आहे.

भर पावसात रोहित पवार यांचं आंदोलन सुरूच आहे. रोहित पवार यांची भेट घेण्यासाठी सरकारकडून मंत्री गिरीश महाजन गेले होते. आमदार शशिकांत शिंदे, शेकापचे जयंत पाटील देखील रोहित पवार यांची भेट घेतली आहे. रोहित पवार यांनी केलेल्या विधानभवनाच्या परिसरातही आवारात केलेल्या आंदोलनाची दाखल उदय सामंत यांनी घेतली.

हे ही वाचा:

दादा भुसे आदित्य ठाकरे यांना म्हणाले की …

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झाले असे, कोसळली दरड

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss