spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अंबानी कुटुंबाच्या अँटिलियाचे ते एक रहस्य तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या…

जगातील प्रसिद्ध उद्योजक(Entrepreneur) मुकेश अंबानी(Mukesh Ambani), पत्नी नीता अंबानी(Nita Ambani) आणि अंबानी कुटुंबाची(Ambani Family) चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. अंबानी कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

जगातील प्रसिद्ध उद्योजक(Entrepreneur) मुकेश अंबानी(Mukesh Ambani), पत्नी नीता अंबानी(Nita Ambani) आणि अंबानी कुटुंबाची(Ambani Family) चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. अंबानी कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. जगातील सर्वात महागड्या घरात अंबानी कुटुंब राहतं. अंबानी कुटुंबाबद्दल जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. दक्षिण मुंबईत(South Mumbai) असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या भव्य घराचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. घरातील प्रत्येक वस्तू प्रचंड महागडी आहे. मुंबईत आलेल्या नव्या लोकांसाठी अँटिलिया (Antilia) केंद्रबिंदू आहे. अँटिलिया २७ मजल्यांची भव्य इमारत आहे. अँटिलियाचं बांधकाम २००४ साली सुरु करण्यात आलं. अँटिलियाचं पूर्ण बांधकाम २०१० मध्ये पूर्ण झालं. पण घराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर देखील जवळपास दीड वर्षानंतर अंबानी कुटुंब नव्या घरात रहायला गेलं. ज्यामुळे अनेक चर्चे रंगल्या. अँटिलिया तयार झालं असताना देखील अंबानी कुटुंबाने नव्या घरात गृहप्रवेश का केलं नाही.

२०१० मध्ये बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अंबानी कुटुंबाने २०११ साली अँटिलियामध्ये प्रवेश केला. अंबानी कुटुंबाने दीड वर्षांनंतर अँटिलियामध्ये प्रवेश केला, ज्यामुळे अनेक चर्चा रंगल्या. काही वास्तू अडचणींमुळे अंबानी कुटुंबाने दीड वर्षांनंतर नव्या घरात प्रवेश केला असं अनेकदा सांगण्यात आलं. अँटिलियामध्ये प्रवेश करण्यापूर्वी अंबानी कुटुंबाने मोठी पूजा देखील घातली होती. ज्यासाठी ५० पंडितांना बोलावण्यात आलं होतं. रिपोर्टनुसार, एका मुलाखतीत नीता अंबानी यांनी रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा असल्याचं सांगितलं आणि वास्तू शास्त्रांच्या अफवांना फेटाळून लावलं.

अँटिलिया बांधण्यासाठी मुकेश अंबानी यांनी २००२ मध्ये एका मुस्लीम चॅरिटेबल ट्रस्टकडून(Muslim Charitable Trust) जमीन खरेदी केली होती. अंबानी कुटुंबाचं घर अँटिलियाची चर्चा कायम चहत्यांमध्ये आणि सोशल मीडियामध्ये रंगलेली असते. एवढंच नाही अनेक कौटुंबिक कार्यक्रम देखील अँटिलियामध्ये मोठ्या थाटात साजरे केले जातात. ज्यासाठी अनेक सेलिब्रिटी आणि उद्योजक अँटिलिया याठिकाणी उपस्थित राहतात. काही दिवसांपूर्वी अंबानी कुटुंबात नव्या चिमुकलीचं आगमन झालं. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी नातीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. अंबानी कुटुंबाचा मोठा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani) आणि पत्नी श्लोका मेहता(Shloka Mehta) यांनी दोन मुलं आहेत. ज्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर अंबानी कुटुंबातील मुलगी ईशा अंबानी(Isha Ambani) यांना देखील जुळी(Twins) मुलं आहेत तर, अनंत अंबानी(Anant Ambani) लवकरच विवाहबंधनात(Marriage) अडकणार आहेत. प्रसिद्ध उद्योजकांची मुलगी राधिका मर्चेंड(Radhika Merchand) यांच्यासोबत अंबानी कुटुंबातील लहान मुलगा सप्तपदी घेणार आहेत. अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा(Engagement) झाला आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

हे ही वाचा:

कोल्हापुरात पावसाचा धुमाकूळ, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

रोहित पवार एकटेच बसले आंदोलनाला

दादा भुसे आदित्य ठाकरे यांना म्हणाले की …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss