spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ज्ञानवापीमधील सर्वेक्षणावर २६ जुलैपर्यंत तूर्तास स्थगिती

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने 26 जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. यासोबतच परिसरात दोन आठवडे कोणत्याही प्रकारचे खोदकाम करू नये, असं देखील सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे.

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने 26 जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. यासोबतच परिसरात दोन आठवडे कोणत्याही प्रकारचे खोदकाम करू नये, असं देखील सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे. ज्ञानवापी मशिदीच्या व्यवस्थापनावर (Gyanvapi Masjid Case) देखरेख करणाऱ्या अंजुमन समितीने (Anjuman Committee) सर्व्हेविरोधात याचिका दाखल केली होती. काशी विश्वनाथ मंदिराशेजारील मशीद परिसराचं सर्वेक्षण करण्याच्या वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. सोमवारी वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार एएसआयचं पथक सर्वेक्षणासाठी मशिदीच्या परिसरात पोहोचलं होतं. सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी सर्वेक्षण पथकाला सकाळी ११. १५ वाजता कोर्टात हजर राहून सर्वेक्षणाची माहिती देण्यास सांगितली होती. याच दरम्यान, सुप्रीम कोर्टाने ज्ञानवापी मशिदीतील सर्व्हेला २६ जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे.

अंजुमन समितीतर्फे वरिष्ठ वकील हुजैफा अहमदी खंडपीठात बाजू मांडत आहेत. शुक्रवारी सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले असून, आम्हाला अपील करण्याची संधी मिळाली नाही आणि त्याआधीच सर्वेक्षण सुरू झाल्याचं अंजुमन समितीकडून सांगण्यात आलं. खोदकामासंदर्भातील आदेश असल्यास आम्हाला दाद मागण्याची संधी मिळावी, असं अहमदी म्हणाले होते. सर्वेक्षणादरम्यान खोदकाम होणार आहे का? असा प्रश्न सरन्यायाधीशांनी विचारला असता, यूपी सरकारचे वकील तुषार मेहता यांनी सांगितलं की सर्वेक्षण हे आधुनिक तंत्रज्ञानाने केलं जाईल. यामध्ये कोणतंही नुकसान होणार नाही. हिंदू पक्षातर्फे ज्येष्ठ वकील श्याम दिवाण यांनीही सर्वेक्षणात कोणतंही खोदकाम होणार नसल्याचं सांगितलं होतं.

अंजुमन समितीचे वकील अहमदी यांनी खंडपीठाला सांगितलं की, आम्ही सर्वेक्षणासाठी दोन-तीन वेळा स्थगिती देण्याची विनंती केली होती, मात्र तरीही सर्वेक्षणाला स्थगिती देण्यात आली नव्हती. वैज्ञानिक सर्वेक्षणाची वेळ अद्याप आलेली नाही, असं आम्ही मानतो आणि पहिलं हे प्रकरण गुणवत्तेवर पाहिलं पाहिजे, असं अहमदी म्हणाले. तर, पश्चिमेकडील भिंतीवर खोदकाम केलं जात असल्याचंही ते म्हणाले. उत्तर प्रदेश सरकारचे वकील तुषार मेहता यांनी मशिद परिसरातील एकही वीट हलवण्यात आली नसल्याचं सांगितलं. आठवडाभर सर्वेक्षणादरम्यान कोणतीही हानी होणार नसल्याचं वकील मेहता म्हणाले होते. मात्र तरीही अहमदी यांनी सर्वेक्षण थांबवण्याची आग्रही मागणी केली आणि सर्वेक्षण दोन दिवस थांबवण्यात आले.

हे ही वाचा:

रोहित पवार एकटेच बसले आंदोलनाला

दादा भुसे आदित्य ठाकरे यांना म्हणाले की …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss