भाऊ आणि बहिणीमधील हा एक सुपर स्पेशल बॉण्ड आहे आणि त्याची तुलना इतर कोणाशीही होऊ शकत नाही. ते एकमेकांशी भांडू शकतात, वाद घालू शकतात आणि एकमेकांना चिडवू शकतात, परंतु ते एकमेकांवर जगातील इतर कोणाहीपेक्षा जास्त प्रेम करतात. २०२२ चे रक्षाबंधन हे अगदी उद्यावर आले आहे. म्हणूनच या सणाच्याप्रसंगी, आम्ही अशा काही बॉलीवूड चित्रपटांची यादी केली आहे ज्यामध्ये नटांनी या विशेष बंधनाचे चित्रण करण्याचे अचूक काम केले आहे.
जोश – शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन: भाऊ-बहिणीच्या नात्याचे खरे सार त्यांच्यातील न संपणाऱ्या मारामारी, खोड्या आणि वादात आहे. मॅक्स आणि शर्लीच्या कडू गोड समीकरणाने आपल्याला तेच दाखवून दिले आहे
जाने तू या जाने ना – प्रतिक बब्बर आणि जेनेलिया डिसूझा:
अदिती (जेनेलिया डिसूझा) उर्फ म्याऊचे जग तिच्या जिवलग मित्र जय (इमरान खान) उर्फ उंदीर भोवती फिरत होते. याचा तिचा भाऊ अमित (प्रतिक बब्बर) वर सर्वात जास्त परिणाम झाला कारण ती त्याची एकुलती एक मैत्रीण होती पण आता तिच्यासाठी तसे राहिले नाही.
अग्निपथ – हृतिक रोशन आणि कनिका तिवारी:
विजय दिनानाथ चौहान यांचे त्यांच्या बहिणीवर असलेले प्रेम अतुलनीय आहे. आयुष्याने जरी त्यांना वेगळे केले तरी त्याने आपल्या बहिणीवरील प्रेम कधीच कमी होऊ दिले नाही. विजय हा खरोखरच एक भाऊ आहे जो आपल्या बहिणीला हसताना पाहण्यासाठी जगाची उलथापालथ करेल.
भाग मिल्खा भाग – फरहान अख्तर आणि दिव्या दत्ता:
फरहान अख्तर आणि दिव्या दत्ता यांच्या अभिनय क्षमतांबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे, त्यामुळे त्यांना चित्रपटात त्यांच्या अभिनयाची चुणूक पाहून आश्चर्य वाटले नाही. या दोघांनी ज्या प्रकारे मिल्खा सिंग आणि त्यांच्या बहिणीने बंधाचे चित्रण केले ते पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले.
दिल धडकने दो – रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रा:
कबीर (रणवीर सिंग) आणि आयशा (प्रियांका चोप्रा) यांनी दिल धडकने दोमध्ये ज्यापद्धतीने भाव बहिणीच्या बाँडचे चित्रण केले आहे. हा आपल्याला बॉलीवूडमध्ये पाहण्याची सवय नव्हती पण तरीही जेव्हा एखाद्याला एखाद्या समस्येने त्रास होत असतो तेव्हा दुसर्याला याची काळजी नक्कीच वाटते.