spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नितीन गडकरी धमकी प्रकरणाला वेगळे वळण

दहशतवादी अफसर पाशा सौदी अरेबियात असताना त्याचा रुममेट म्हणून पाकिस्तान, बांगलादेशातील दोन तरुण होते. त्यापैकी पाकिस्तानी युवक हा लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य होता.

दहशतवादी अफसर पाशा सौदी अरेबियात असताना त्याचा रुममेट म्हणून पाकिस्तान, बांगलादेशातील दोन तरुण होते. त्यापैकी पाकिस्तानी युवक हा लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य होता. तसेच बेंगळुरूतील टाटा इन्स्टिट्यूट येथील बॉम्बस्फोटात सहभागी असलेला अब्दूल रहेमान हादेखील पाशासोबत सौदी अरेबियात होता, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली. पाशा हा सध्या धंतोली पोलिसांच्या ताब्यात आहे.

लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा कट्टर समर्थक दहशतवादी बशीरुद्दीन ऊर्फ अफसर पाशावर (४५) तुरुंगातील कैद्यांचे ‘ब्रेनवॉश’ करण्याची जबाबदारी होती. विशिष्ट धर्माच्या कैद्यांना आपल्या जाळ्यात ओढून तो त्यांना दहशतवादी संघटनेत सहभागी करून घेत होता, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी आणि खंडणी मागणारा जयेश पुजारी ऊर्फ जयेश कांथाचेही त्याने ‘ब्रेनवॉश’ केले. या प्रकरणात त्याला आरोपी करण्यात आले. बेळगावहून नागपुरात आणलेल्या पाशाच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल. बेळगाव कारागृहात वापरत असलेला मोबाईल पाशाने नष्ट केला असला आणि गुन्ह्यासंदर्भात तो काहीही माहिती देत नसला तरी त्याच्याविरुद्ध पोलिसांकडे भक्कम पुरावे आहेत. मोबाईल, सीडीआर तपासात इलेक्ट्रॉनिक्स पुरावे गोळा केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, प्रकरणाचा तपास एनआयएकडे जाण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे तपासाला पाहिजे तशी गती येत नव्हती.

आता नागपूर पोलिसांची जबाबदारी वाढली आहे. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली जाईल. यावेळी पाशाकडून गुन्ह्यासंदर्भात माहिती काढण्यात यश मिळेल, असा पोलिसांना विश्वास आहे.अफसर पाशा हा पोलिसांना तपासात सहकार्य करीत नाही. पाशाने गुन्ह्यासंदर्भात ठोस कोणतीच माहिती दिली नाही. तो केवळ कौटुंबिक माहिती आणि मागचा इतिहास सांगतो. लष्कर-ए-तोयबाचा समर्थक असल्याचीही कबुली देतो. मात्र, सध्याच्या गुन्ह्यासंदर्भात काहीच माहिती तो देत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतरही तो अतिशय शांत असतो. कशाचीही मागणीदेखील करीत नाही. तो दररोज नवनवीन काहीतरी सांगून पोलिसांची दिशाभूल करीत असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा:

अंबादास दानवे यांनी सरकारवर केला हल्लाबोल

पृथ्वीराज चव्हाण यांनी टाकला राजकीय बॉम्ब

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss