spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

India vs West Indies चा दुसरा कसोटी सामना अनिर्णित

सध्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिजचा (India vs West Indies) कसोटी सामना पार पडला. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिकेमधील दुसरा आणि शेवटचा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला आहे.

सध्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिजचा (India vs West Indies) कसोटी सामना पार पडला. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिकेमधील दुसरा आणि शेवटचा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला आहे. सकाळपासूनच पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे पावसाने हजेरी लावली आहे. दोन सत्रांचा खेळ संपला तरी पावसाने थांबायचे नाव घेतले नाही त्यामुळे अखेर पंचानी सामना अनिर्णित घोषित केला आहे. शेवटच्या दिवशी वेस्ट इंडिजच्या संघाला जिंकण्यासाठी २८९ धावांची गरज होती. भारताच्या संघाने वेस्ट इंडीजसामोर ३६५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरास वेस्ट इंडिजच्या संघाने ३२ षटकांत २ बाद ७६ धावांपर्यत मजल मारली होती. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दोन सामान्यांची मालिका भारताने १-० च्या फरकाने जिंकली.

शेवटच्या दिवशी भारताला आठ विकेट तर वेस्ट इंडिजला २८९ धावा हव्या होत्या. परंतु पावसाने सामन्यात अडथळा घातला. त्यामुळे २ कसोटी सामना अनिर्णित ठेवावा लागला. पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारताच्या संघाने एक डाव १४१ धावांनी विजय मिळवला. त्याच्या सारखाच दुसरा सामना जिंकून क्लिन स्वीप करण्याचे भारताचे प्रयत्न पावसामुळे अपुरे राहिले. दुसरा सामना अनिर्णित राहिल्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दोन्ही संघाला चार चार गुण देण्यात आलेय. आता भारताचा संघ पाच महिन्यांपर्यत एकही कसोटी सामना खेळणार नाही. २७ जुलैपर्यत भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे.

भारताची सलामी जोडी यशस्वी जयस्वाल आणि भारताचा कर्णधार रोहित शर्मा यांची जोडी हिट ठरली. त्याच भारताचा अनुभवी खेळाडू विराट कोहलीने त्यांची बॅट चालवली. त्याचबरोबर त्याने शतक सुद्धा झळकावले. भारताचा युवा खेळाडू शुभमन गिल आणि भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे हे दोन्ही खेळाडू फेल झाले. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी त्यांच्या फिरकीने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना पुन्हा कॉरिडॉर मध्ये पाठवले.

हे ही वाचा:

नितीन गडकरी धमकी प्रकरणाला वेगळे वळण

अजित पवारांनी केली विधानपरिषदेत मोठी घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss