spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Dream Girl 2 चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

'ड्रीम गर्ल २' चित्रपटाच्या रिलीजपूर्वी आज चित्रपटाच्या निर्मात्यांनी आयुष्मान खुरानाच्या या चित्रपटातील फर्स्ट लुक (First look) चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.आयुष्मान खुरानाने याआधीही 'ड्रीम गर्ल २' चे प्रोमो शेयर केले होते.

‘ड्रीम गर्ल २’ चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराणा (Ayushmann Khurrana) असून त्याचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘ड्रीम गर्ल २’ चित्रपटाच्या रिलीजपूर्वी आज चित्रपटाच्या निर्मात्यांनी आयुष्मान खुरानाच्या या चित्रपटातील फर्स्ट लुक (First look) चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.आयुष्मान खुरानाने याआधीही ‘ड्रीम गर्ल २’ चे प्रोमो शेयर केले होते. ज्यामध्ये तो अनेक अभिनेत्यांसोबत बोलतांना दिसला होता. त्यात त्याने पठाण म्हणजेच शाहरुख, रणबीर, रणवीर यांच्यासोबत फोनवर गप्पा मारल्या होत्या.

मात्र त्यावेळी त्याने त्याचा चेहरा दाखवला नव्हता. आता आयुष्मान खुरानाने ‘ड्रीम गर्ल २’ या चित्रपटातील त्याचा म्हणजेच पूजाचा फर्स्ट लूक (First look) सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.आयुष्मान खुरानाने शेअर केलेल्या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तो पूजाच्या भूमिकेत आपल्या हातात लिपस्टिक पकडून आरशात बघताना दिसत आहे. मात्र आरशाच्या दुसऱ्या बाजूला आयुष्मान खुराना दिसत आहे.पूजाची झलक शेयर करत आयुष्मानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘ही फक्त पहिली झलक आहे. आरशात दिसणाऱ्या वस्तू या खऱ्या दिसण्यापेक्षा जास्त सुंदर असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल २’ मधील हा फर्स्ट लूक (First look) सध्या सोशल मिडियावर खूप जास्त व्हायरल झाला आहे. त्याच्या या फोटोवर नेटकरी कमेंट करत आहेत. हा फर्स्ट लूक पाहून चाहते त्याच्या चित्रपटाची अधिक प्रतिक्षा करत आहेत. या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडेसोबत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातुन ते पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेयर करणार आहेत. ‘ड्रीम गर्ल २’ हा चित्रपट २०१९ मध्ये आलेल्या आयुष्मानचा सुपरहिट सिनेमा ‘ड्रीम गर्ल’चा हा सिक्वेल आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य करत असून आयुष्यमान आणि अन्यनासोबत यात अन्नू कपूर, परेश रावल, सीमा पाहवा, विजय राज, मनोज जोशी, राजपाल यादव आणि असरानी असे अनेक कलाकार दिसून येणार आहेत. दरम्यान हा चित्रपट २५ ऑगस्ट २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हे ही वाचा:

Kaun Banega Crorepati 15, अखेर शूटिंगला सुरुवात…

 टीम इंडियाच्या नावावर नवीन वर्ल्ड रेकॉर्ड.

स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णीचा साखरपुडा थाटात संपन्न,पहा फोटोज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss