spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

देवेंद्र फडणवीसांनी लिहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

सध्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. याचदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) १४ मार्चच्या एका शासन निर्णयावर आक्षेप घेतला आहे.

सध्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. याचदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) १४ मार्चच्या एका शासन निर्णयावर आक्षेप घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बाह्य यंत्रणेकडून काम करून घेण्यासाठी नियुक्त संस्थांचा शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे अशी माहिती समोर आली आहे. यासंदर्भामध्ये देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांना यासंबंधी पत्र लिहीलं आहे. १४ मार्च २०२४ रोजी कामगार विभागाने शासन निर्णय काढून नऊ संस्थांना मान्यता दिली होती.

या संस्थांना काम देताना त्यांना देण्यात येणार वेतन आणि मानधन यावर भारतीय जनता पार्टीचे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते. यासंदर्भामधील मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझाने याबद्दलचे वृत्त दिले आहे. यामुळेच फडणवीसांनी शासन निर्णयात याबद्दल स्पष्टता नासल्याचा आक्षेप घेतला आहे. तसेच हा शासन निर्णय रद्द करून नवीन मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करावा असेही फडणवीस यांनी म्हटले आहेत.

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, १४ मार्च २०२४ रोजी कामगार विभागाने बाह्य यंत्रणेकडून काम करून घेण्यासाठी नियुक्त केलेल्या ९ कंपन्यासाठी दाखवलेला खर्च व्यवस्थित नाही. त्यांनी यावर आक्षेप घेतला, तसेच हा आदेश रद्द करण्याची मागणी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली. या कामांसाठी कंपन्यांना मिळणारी रक्कम आणि कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मिळणाी रक्कम याबद्दल स्पष्टता नसल्याचे फडणवीस म्हणाले. शासन निर्णयानुसार, जर असिस्टंट मॅनेजर पदावरील व्यक्तीला ६२,९०० रुपये इतकी रक्कम दिली तर कायदेशीर किमान वेतन हे सदर व्यक्तीला १८,९०८ रुपये इतके जाईल. तर ४३,९९२ इतकी रक्कम कंपनीकडे शिल्लक राहते. त्यामुळे मोठा नफा कंपनीलाच मिळेल आणि कामगाराला अत्यंत कमी रक्कम मिळेल.

हे ही वाचा:

मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष अविश्वास ठरावाचा प्रस्ताव मांडण्याची शक्यता

India vs West Indies चा दुसरा कसोटी सामना अनिर्णित

अखेर Devendra Fadnavis म्हणाले, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री! अजित पवार हे…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss