spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ही बैठक गोवा-सिंधुदुर्ग घेण्यात यावी, अनिल परब

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये अनेक मुद्द्यांवर प्रश्न विरोधी पक्षांनी उपस्थित केले आहेत.

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये अनेक मुद्द्यांवर प्रश्न विरोधी पक्षांनी उपस्थित केले आहेत. विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु यामध्ये विधान परिषदेमध्ये एका मुद्द्यावर सदस्यांमध्ये चर्चा सुरु असताना बैठकीमध्ये गोव्याला न्यायाची मागणी ठाकरे गटाचे सदस्य अनिल परब (Anil Parab) यांनी केली. यावर सभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी तुमचा अभ्यास आहे, तुम्ही रिसॉर्ट सुचवा, अशी मिश्लिक प्रतिक्रिया दिली. यावरून सभागृहात एकच हशा पिकला.

राज्याचे शिक्षणाधिकारी यांच्या विभागीय चौकशीबाबत अब्दुल्ला खान दुर्रानी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर चर्चा करतांना अनिल परब आणि दीपक केसरकर यांच्यात टोलेबाजी झाली. यावर उपसभापती निलम गोऱ्हे यांनीही वक्तव्य केले. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अब्दुल्ला खान दुर्रानी यांच्या प्रश्नाला उत्तर दिले. मात्र उत्तरात समाधानी न झालेल्या आमदारांनी स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी केली.

अनिल परब यांनी अधिवेशनामध्ये बोलताना, ही बैठक गोवा- सिंधुदुर्ग घेण्यात यावी. मागे आपण काही आमदारांची त्या ठिकाणी व्यवस्था केली होती. हे आम्हाला माहिती आहे. आता आम्हालाही घेऊन जावा आणि आमच्याही शंकेचे निरासन करावे, असा चिमटा अनिल परब यांनी काढला. नीलम गोऱ्हे यांनी सर्व आमदारांचे मते जाणून घेतले. यावेळी अनिल परब सतत हात वर करत होते. यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या, परब तुम्हाला बैठकीला जायचे आहे का?, त्यावर परब म्हणाले माझी सूचना आहे. यावर, तुमचा अभ्यास असेल तुम्ही रिसॉर्ट वैगेर नंतर सांगा, अशी मिश्लिक टिप्पणी नीलम गोऱ्हे यांनी केली.

हे ही वाचा:

मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष अविश्वास ठरावाचा प्रस्ताव मांडण्याची शक्यता

India vs West Indies चा दुसरा कसोटी सामना अनिर्णित

अखेर Devendra Fadnavis म्हणाले, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री! अजित पवार हे…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss