spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Kiara Advani ने दिली तिच्या खास व्यक्तीला फ्लाईंग किस

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी नेहमीच ती तिच्या चित्रपटांमुळे आणि तिच्या खासगी जीवनामुळे चर्चेत असते.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी नेहमीच ती तिच्या चित्रपटांमुळे आणि तिच्या खासगी जीवनामुळे चर्चेत असते. नुकताच अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांचा ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले त्याचबरोबर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटामधील कियाराच्या कामाचे प्रेक्षकांनी कौतुक देखील केले आहे. कियाराने या वर्षीच फेब्रुवारी महिन्यात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली. प्रोफेशनल लाइफ आणि पर्सनल लाईफ या दोघांचाही उत्तम मेळ घालत ती काम करताना दिसत आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या कुटूंबाशी कियाराचं चांगले संबंध आहेत त्याचबरोबर सासूबाईंसोबतही तिचा उत्तम बाँड आहे. कियारा बऱ्याच वेळा तिच्या सासूसोबत स्पॉट झाली आहे. सध्या कियाराचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून रँपवॉक करताना तिच्या एका कृतीची खूप चर्चा होत आहे. कियारा रँपवॉक करताना तेथे तिने एका खास व्यक्तीला फ्लाईंग किस दिल्याने सर्वांचेच लक्ष तिकडे वेधलं गेलं. मंगळवारी पार पडलेल्या India Couture Week 2023 मध्ये डिजाइनर फाल्गुनी आणि शेन पिकॉक यांच्या कलेक्शनसाठी रँपवॉक केला. या इव्हेंटमध्ये तिने गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस घातला होता, त्यामध्ये ती अतिशय सुंदरही दिसत होती. याच इव्हेंटमधील तिच्या रँपवॉकचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या इव्हेंटसाठी अभिनेता आणि तिचा पार्टनर सिद्धार्थ मल्होत्रा तर उपस्थित नव्हता, पण त्याची आई , कियाराची सासू मात्र आवर्जून उपस्थित होत्या. अतिशय ग्रेसफुली रँपवॉक करताना कियाराने साईडला बसलेल्या सासूबाईंना पाहून फ्लाईंग किस दिले. त्यांनीही तेवढ्याच प्रेमाने तिला फ्लाईंग किस देत तिच्यासाठी कौतुकाने टाळ्याही वाजवल्या. सासू-सुनेचे हे बॉंडिंग सर्वांनाच खूप आवडले असून या व्हिडीओवर त्यांचे कौतुकही होत आहे.

हे ही वाचा:

मोदींनी दिल्यात, ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या हातात तिजोरीच्या चाव्या , उद्धव ठाकरे

मनसेने दिले भाजपाला तोडीस तोड उत्तर | MNS | Amit Thackeray | Raj Thackeray |

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss