spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अंजु प्रकरणावर सीमा हैदर म्हणाली…

अंजू नावाची एक भारतीय महिला पाकिस्तानात पोहचली आहे. आपल्या प्रियकरासाठी पाकिस्तानात आल्याचं तिने म्हटलं आहे. प्रियकरासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचं प्रकरण ताजं असतानाच ही नवी घटना समोर आली आहे. राजस्थानच्या भिवडीमधली विवाहिता अंजू ही थेत पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात प्रियकराला भेटण्यासाठी गेली आहे.

अंजू नावाची एक भारतीय महिला पाकिस्तानात पोहचली आहे. आपल्या प्रियकरासाठी पाकिस्तानात आल्याचं तिने म्हटलं आहे. प्रियकरासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचं प्रकरण ताजं असतानाच ही नवी घटना समोर आली आहे. राजस्थानच्या भिवडीमधली विवाहिता अंजू ही थेत पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात प्रियकराला भेटण्यासाठी गेली आहे. तिच्या पतीला आणि मुलांना सोडून तिने पाकिस्तान गाठलं. ज्यानंतर तिच्या पतीने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. नसरुल्लाह या फेसबुक फ्रेंडसाठी भारत सोडून पाकिस्तानात गेलेल्या अंजूने आता तिचा धर्म बदलून आणि नाव बदलून त्याच्याशी निकाह केला आहे. अंजूने इस्लाम धर्म स्वीकारला आणि स्वतःचं नाव फातिमा ठेवल्याच्या बातम्या मंगळवारीच आल्या. त्यानंतर आता या सगळ्या प्रकरणावर सचिन मीनासाठी भारतात आलेल्या सीमा हैदरने प्रतिक्रिया दिली आहे. अंजूने फातिमा हे स्वतःचं नाव ठेवून तिच्या मित्राशी निकाह केला आहे. या प्रकरणी आता सीमा हैदरने भाष्य केलं आहे.

आता यासंदर्भात सीमा हैदर हिला विचारले असता, अंजू ही पाकिस्तानी मित्राशी लग्न करायला भारतातून तिकडे गेली. तिने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि मग ती पाकिस्तानात गेली आहे या सगळ्यावर तुमचं काय म्हणणं आहे सीमा हैदरला विचारलं असता, सीमा म्हणाली “अंजू भारतात राहत होती. भारत हा असा देश आहे जिथे माणूस काहीही करु शकतो. कारण तसं वागण्याचं माणसाला स्वातंत्र्य असतं. पाकिस्तान असा देश आहे जिथे हे कळलं असतं की मी देश सोडला आहे तर माझ्याबरोबर काहीही बरं वाईट घडू शकलं असतं. हैदरला (सीमाचा नवरा) समजलं असतं की माझं हिंदू मुलावर प्रेम आहे तर त्याने माझी हत्या केली असती. भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये महिलांना जी वागणूक मिळते त्याबाबत काय मत आहे असं विचारलं असता सीमा म्हणाली, “सिंध आणि बलोच हे असे प्रांत आहेत जिथे महिलांना काहीही आदर दिला जात नाही. सिंधमध्ये माझ्या वयाची एकही महिला शिकलेली नाही. एखाद्या महिलेची ओढणी जर डोक्यावरुन खाली आली तर तिला शिवीगाळ केली जाते. सिंध आणि बलोच महिलांसाठी नियम खूप कठोर आहेत. आम्हाला बुरखा परिधान करावा लागतो. भारतात मात्र ती स्थिती नाही. भारतात महिलांचा खूप आदर केला जातो. मी भारतात आले आहे तेव्हापासून मलाही आदराने वागवलं जातं आहे.

मात्र या संबंधी अंजु हिच्या वडिलांनी नवीनच खुलासा केला आहे. अंजू जयपूरला जाते हे सांगून पाकिस्तानला गेली हे मला सोमवारी कळलं आहे. माझा मुलगा डेव्हिडने मला सांगितलं की दीदी (अंजू) पाकिस्तानला गेली. मला याबाबत काही माहिती नाही. तिचं लग्न झाल्यापासून म्हणजेच मागच्या २० वर्षांपासून आमचा फारसा संपर्क नाही. लग्नानंतर ती भिवाडी या ठिकाणी पतीसह राहते आहे. तर मी मध्य प्रदेशातल्या गावात वास्तव्य करतो. एवढंच नाही तर अंजूचं मानसिक आरोग्य फारसं ताळ्यावर नसतं आणि ती विक्षिप्त आहे. देखील अंजु हिच्या वडिलांनी सांगितलं आहे. तीच लग्न झालं माझा जावई अरविंद हा एकदम साधा माणूस आहे. अंजू मात्र विक्षिप्त आहे. तिचं तिच्या मित्राशी अफेअर वगैरे असेल असंही मला वाटत नाही. ती फक्त विक्षिप्तपणातून किंवा डोक्यात एक सणक आली म्हणून त्याला भेटायला गेली असेल एवढं मी खात्रीने सांगू शकतो असंही थॉमस यांनी सांगितलं आहे. मी तिच्या विक्षिप्त स्वभावामुळेच तिच्याशी फारसा संपर्कात नसतो अंजु हिच्या वडिलांनी सांगितलं आहे .

हे ही वाचा:

सीमा हैदर प्रकरणानंतर आता अंजु प्रकरण…

इगतपुरीमधील महिलेचा मुद्दा अधिवेशनात चर्चेत, फडणवीस-पटोले यांच्यामध्ये खडाजंगी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss