spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ODI मालिकेला आजपासून सुरुवात, पहिला सामना भारतासाठी लकी की अनलकी

टीम इंडियाने (India) वेस्ट इंडिज दौऱ्याची (West Indies tour) सुरुवात विजयाने केली. टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्धची २ सामन्यांची मालिका १-० ने जिंकली. त्यानंतर आता या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची एकदिवसीय (ODI) मालिका होणार आहे.

टीम इंडियाने (India) वेस्ट इंडिज दौऱ्याची (West Indies tour) सुरुवात विजयाने केली. टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्धची २ सामन्यांची मालिका १-० ने जिंकली. त्यानंतर आता या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची एकदिवसीय (ODI) मालिका होणार आहे. या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना केनसिंग्टन ओव्हल बारबाडोस (Kensington Oval Barbados) इथे खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर शाई होप (Shai hope) याच्या कॅप्टन्सीत वेस्ट इंडिज संघ मैदानात उतरेल. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरुवात होणार आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया आतापर्यंत एकूण १३९ सामन्यात आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये आकडेवारीच्या दृष्टीने टीम इंडियाची बाजू मजबूत आहे. टीम इंडियाने १३९ पैकी ७० सामन्यात विंडिजवर विजय मिळवला आहे. तर वेस्ट इंडिजने ६३ वेळा टीम इंडियावर मात केली आहे. २ सामने हे टाय झाले आहेत. तर ४ सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. या वनडे सीरिजसाठी टीम इंडियात एकूण २ विकेटकीपरचा (Wicketkeepers) समावेश करण्यात आला आहे. ईशान किशन (Ishan Kishan) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) हे विकेटकीपरची भूमिका बजावणार आहेत. मात्र या दोघांपैकी पहिल्या सामन्यात विकेटकीपर म्हणून प्लेईंग इलेव्हनमध्ये (Playing XI) कुणाचा समावेश करण्यात येणार, याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.

सामना कुठे पाहता येणार?

दरम्यान विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील वनडे सीरिजमधील सर्व सामने हे टीव्हीवर डीडी स्पोर्ट्स(DD Sports) चॅनेलवर लाईव्ह(Live) पाहता येतील. तसेच मोबाईलवर फॅन कोड (Fan code) आणि जिओ सिनेमा(Jio Cinema) या एपवरही मॅच लाईव्ह पाहता येईल.

भारताच्या संघाचा स्क्वाड –

रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज संघाचा स्क्वाड –

शाई होप (कॅप्टन) (विकेटकीपर), रोवमन पॉवेल (उपकर्णधार), एलिक एथनेज, यानिक कॅरिया, कीसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्जारी जोसफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडकेश मोती, जेडन सील्स, रोमारियो शेफर्ड, केविन सिंक्लेयर आणि ओशेन थॉमस.

हे ही वाचा:

राशिभविष्य, २७ जुलै २०२३, आजचा दिवशी नव्या संधी लाभदायक…

नागपूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी

पावसाळ्यात वापरल्या जाणाऱ्या छत्रीचा शोध नेमका कसा लागला?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss