spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दिल्लीत पुन्हा एकदा मास्क सक्ती तर, राज्यातही कोरोना रुग्णसंखेत वाढ

मुंबई : कोरोनाने (Corona) पुन्हा एकदा देशभरात थैमान घातला आहे. भारत देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा चार कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 16,299 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,26,879 लोकांना जीव गमवावा लागला आहे. दिल्लीत (Corona patients) कोविड-19 मुळे मृतांची संख्या 26,351 इतकी झाली असून, राष्ट्रीय राजधानीत गेल्या एका आठवड्यात कोरोनाच्या नव्या दैनंदिन रूग्णसंख्येमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. अशातच आता दिल्लीकरांच्या (Delhi) चिंतेत भर पडली आहे. सातत्याने रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा मास्क सक्ती लागू (Mask compulsory in delhi) करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास 500 रुपयांचा दंड बसणार आहे.

या सक्तीतून खासगी चारचाकी वाहना चालकांना आणि त्यातून प्रवास करणाऱ्यांना सूट देण्यात आली असून, खासगी वाहनामध्ये मास्क घालणे अद्यापही अनिवार्य आले नाही. मास्क सक्ती नियमाचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, सर्व सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावरील मास्क घालणे अनिवार्य असणार आहे.

राज्यातही करोनाच धोका वाढला

मुंबई आणि दिल्लीत हा धोका पुन्हा वाढला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आता सुरक्षेची पावलं उचलण्यात सुरुवात झाली आहे. दरम्यान, कोरोना आणि साथीच्या आजारामुळे मुलांचं आरोग्य धोक्यात असल्याचा इशारा सर गंगाराम हॉस्पिटलच्या बाल-अतिदक्षता विभागाचे संचालक अनिल सचदेव यांनी दिला आहे. मुलांची योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

हेही वाचा : 

Jammu Kashmir : राजौरीमध्ये भारतीय लष्कराकडून 2 दहशतवादी ठार, तर 3 जवान शहीद

Latest Posts

Don't Miss